टेनिस अजिंक्यपद स्पर्धा

टेनिस अजिंक्यपद स्पर्धा

04550

टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 

पुण्याच्या अर्णव पापरकरचा
मानांकित खेळाडूवर विजय

तिसऱ्या मानांकित हरियाणाच्या अर्जुन राठीचा पराभव

कोल्हापूर, ता. २३ : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना (केडीएलटीए) यांच्या वतीने व ‘डी. वाय. पाटील ग्रुप’ पुरस्कृत १८ व्या रमेश देसाई मेमोरियल १६ वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात क्वालिफायर अर्णव पापरकर याने तिसऱ्या मानांकित हरियाणाच्या अर्जुन राठीचा ६-४, ६-२ असा पराभव करून खळबळजनक निकाल नोंदवला.
केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स, कोल्हापूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात हरियाणाच्या बिगरमानांकित रणवीर सिंगने महाराष्ट्राच्या पाचव्या मानांकित श्रीकर डोनीचा ६-३, १-६, ६-० असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. दिल्लीच्या आश्रव्य मेहराने कर्नाटकच्या आठव्या मानांकित अयाज आहिलचे आव्हान ६-२, ६-२ असे संपुष्टात आणले. कर्नाटकच्या श्रीनिकेत कन्नन याने तमिळनाडूच्या अकराव्या मानांकित व्ही. थिरुमुर्गनचा ६-३, ७-५ असा पराभव करून तिसऱ्या फेरीत धडक मारली. चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या समर्थ संहिता याने आपला राज्य सहकारी अद्विक नाटेकरचा ६-४, ६-० असा पराभव करून आगेकूच केली. मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या सेजल भुतडा, नैनिका बेन्द्रम, गुजरातच्या जानवी आसावा यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल-
मुख्य ड्रॉ (दुसरी फेरी) : मुले : धीरज रेड्डी व्ही (तेलंगणा) (१) वि.वि. श्रीनिवास कुरापती (आंध्रप्रदेश) ६-४, ६-३; प्रणील शर्मा (दिल्ली) वि.वि. राहुल लोकेश (तेलंगणा) ६-२, ६-३; गंधर्व कोठापल्ली (कर्नाटक) (१४) वि.वि. नितिक शिवकुमार (तमिळनाडू) ६-१, ६-३; आश्रव्य मेहरा (दिल्ली) वि.वि. अयाज आहिल (कर्नाटक)(८) ६-२, ६-२; समर्थ संहिता (महाराष्ट्र) (४) वि.वि. अद्विक नाटेकर (महा.) ६-४, ६-०; रणवीर सिंग (हरियाणा) वि.वि. श्रीकर डोनी (महा.) (५) ६-३, १-६, ६-०; अर्णव पापरकर (महा.) वि.वि. अर्जुन राठी (हरियाणा) (३) ६-४, ६-२; श्रीनिकेत कन्नन (कर्नाटक) वि.वि. व्ही थिरुमुरूगन (तमिळनाडू) (११) ६-३, ७-५.
मुली : सेजल भुतडा (महा.) (१) वि.वि. पाल उपाध्याय (गुजरात) ६-४, ६-२; नैनिका बेन्द्रम (महा.) (१३) वि.वि. कृष्णा राज (ओडिशा) ६-२, ६-२; जानवी आसावा (गुजरात) वि.वि. अरझान खोराकीवाला (कर्नाटक) (१०) २-६, ६-३, ६-३.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com