पाहणी प्रशासक

पाहणी प्रशासक

04577

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची
प्रशासकांकडून पाहणी

कोल्हापूर, ता. २३ : कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले असून, जुलैअखेर कार्यान्वित करून पंचगंगा प्रदूषण रोखण्यातील एक टप्पा पूर्ण होणार आहे. तर दुधाळी येथील केंद्राचे बांधकाम ऑगस्टअखेर पूर्ण केले जाणार आहे. त्या कामांची प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाहणी केली.
शहरातील सांडपाण्यापैकी ८५ ते ९० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. उर्वरित सांडपाण्यावर तसेच काळम्मावाडी योजना कार्यान्वित झाल्यानंतर जादा होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी अमृत योजनेतून दुधाळी व कसबा बावडा येथे अनुक्रमे ६ व ४ एमएलडी क्षमतेची केंद्रे बांधण्यात येत आहेत. कसबा बावडा येथील केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे. वीजपुरवठा सुरू करणे व सांडपाणी घेण्यासाठी पाईपलाईन जोडण्यासाठी जयंती नाला येथील उपसा केंद्र बंद करावे लागणार आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर तेथील उपसा आपोआपच बंद होणार आहे. त्या काळात काम करण्यात येणार आहे. जुलैअखेर ते कार्यान्वित करून महत्त्वाचा टप्पा पार केला जाणार आहे. दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे बांधकाम ऑगस्टअखेर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तोही त्यानंतर कार्यान्वित करण्यात येणार आहे. पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत व नोबेल कन्स्ट्रक्शन्स कंपनीचे अभियंता सुहेल अक्तार व श्रीरंग माने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com