प्रशासक पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासक पाहणी
प्रशासक पाहणी

प्रशासक पाहणी

sakal_logo
By

04572
...

‘थेट पाईपलाईन’ योजनेची अपूर्ण
कामे तातडीने काम पूर्ण करा

डॉ.कादंबरी बलकवडेः योजनेच्या कामाची केली पाहणी

कोल्हापूर, ता. २३ : ‘थेट पाईपलाईन’ योजनेच्या दोन्ही जॅकवेलची अपूर्ण कामे कर्मचारी व यंत्रसामुग्री वाढवून तातडीने काम पूर्ण करा. वेगवेगळ्या टीम करून २४ तास काम करण्याची सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिल्या.
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची त्यांनी आज पाहणी केली. पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या कामाची माहिती विजय मोहिते व राजेंद्र माळी यांनी दिली. इंटेक वेल, जॅकवेलला जोडणाऱ्या पाईप, कॉपर डॅम, इन्स्पेक्शन वेल, स्लॅबच्या कामाची पाहणी केली. पंप रूमचे बांधकाम, ब्रिजचे बांधकाम, इलेक्ट्रीक सबस्टेशनचे बांधकाम ही कामे नियोजित वेळेनुसार पूर्ण करा. आवश्यकतेप्रमाणे प्रत्येक कामासाठी वेगवेगळे कर्मचारी व मशिनरीची टीम लावून २४ तास काम सुरू ठेवण्याचे निर्देश ठेकेदारांना दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, शाखा अभियंता संजय नागरगोजे, प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र माळी, युनिटी कन्स्लटंटचे विजय मोहीते, आर.बी.पाटील आदी उपस्थित होते.