स्थानिक एसआयएलसी

स्थानिक एसआयएलसी

SIILC चा लोगो घेणे...

किचन गार्डनविषयी मार्गदर्शनासाठी
शनिवारी कोल्हापुरात कार्यशाळा
कोल्हापूर, ता. २३ : किचन गार्डन ही उत्तम संकल्पना असून, त्याद्वारे भाजीपाला, सक्युलंट्‌स आणि कॅक्टस, फॉलिएज व फुलझाडे आणि इतर पिके व झाडे घरासाठी पिकविणे शक्य आहे. आजकाल सर्वजण आहाराबाबत चौकस असल्याने रोजच्या खाण्यात ताजा आणि विषमुक्त भाजीपाला हवासा वाटतो. या पद्धतीने असा भाजीपाला आपण कसा पिकवू शकतो व शोभेची इतर झाडेही घरच्या घरी कशी तयार करू शकतो, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारी एकदिवसीय कार्यशाळा कोल्हापूर येथे शनिवारी (ता. २७) आयोजित केली आहे.
टेरेस गार्डन, बाल्कनी गार्डन, इनडोअर भाजीपाला गार्डन, आउटडोअर भाजीपाला गार्डन, जनरल किचन गार्डन आदी प्रकार, टेरेस वा घराजवळील जागेत भाजीपाल्याशिवाय हंगामी कोणकोणती फुलझाडे व शोभेची झाडे आपण लागवड करू शकतो, त्यासाठीचे नियोजन, माती व कुंड्या भरण्याची पद्धती तसेच अन्नद्रव्य आणि रोग-कीड नियंत्रण, हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स, एक्वापोनिक्स आदींविषयी या कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे. घरातल्या घरात लागवड केलेल्या सेंद्रिय भाज्यांचे आरोग्यदायी फायदे, अन्नसेवनाचे प्रमाण, वैद्यकीय फायदे, आर्थिकदृष्ट्या लागवड कशी करावी, लागवडीसाठी आवश्यक प्रकाश, जागा, पाणी, रोपे, वनस्पती पोषण याविषयीही सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.

००००
प्रतिव्यक्ती शुल्क १५०० रुपये.
कार्यशाळेचे ठिकाण ः ‘सकाळ’ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, पार्वती चित्रमंदिरजवळ, कोल्हापूर
नोंदणीसाठी संपर्क : ९१७५७२४३९९

००००
कार्यशाळेत काय शिकणार?

- किचन गार्डनचे प्रकार, त्यासाठीचे नियोजन व पूर्वतयारी
- मानवी आहारासाठी आवश्यक भाजीपाला व लागवड
- शोभेची झाडे व त्याचे प्रकार
- माती व सेंद्रिय खतांचे नियोजन
- कुंड्या, वाफे भरण्याची शास्त्रोक्त पद्धती
- भाजीपाल्याची शास्त्रोक्त लागवड
- सेंद्रिय पद्धतीने कीड-रोगांचे नियंत्रण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com