शिवाजी विद्यापीठात ‘बीएसस्सी बीएड’ अभ्यासक्रम

शिवाजी विद्यापीठात ‘बीएसस्सी बीएड’ अभ्यासक्रम

लोगो
...

विद्यापीठात ‘बीएस्सी बीएड’ अभ्यासक्रम

प्रस्तावाला मान्यता; व्यवस्थापन परिषदेची बैठक

कोल्हापूर, ता. २३ ः नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठ काही नवे अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. याअंतर्गत बीएस्सी बीएड अभ्यासक्रम सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.
या शैक्षणिक धोरणाअंतर्गत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना टप्प्याटप्याने स्वायत्तता मिळणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने विविध स्वरूपातील काही नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात बीएस्सी बीएड अभ्यासक्रमाचा समावेश आहे. त्याची सुरूवात करण्यासाठी एनसीआरटीला पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. आजीवन शिक्षणासह अन्य काही विभागांच्या संचालकपदाच्या युजीसीने ठरवून दिलेल्या निकषानुसार समकक्षतेबाबत पुढील कार्यवाहीचा प्रस्ताव मंजूर केला. राज्यातील विविध १५ अकृषी विद्यापीठे आणि शासनमान्य अभिमत विद्यापीठांतील शिक्षक, शिक्षक समकक्ष अशी ६५९ पदांच्या भरतीला शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ मध्ये मान्यता दिली. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाला ७२ पदांच्या भरतीसाठी मान्यता मिळाली. त्यात सहायक प्राध्यापकांची ६२, तर सहयोगी प्राध्यापकांची १० पदे आहेत. या पदांचे अधिविभागनिहाय रोस्टर तयार करून तपासणी, मान्यतेसाठीचा प्रस्ताव फेब्रुवारीमध्ये विद्यापीठ प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला आहे. या पदांच्या भरतीच्या प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता मिळाली. कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे निधन झाले. त्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली.
............

आतापर्यंत ५५१ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर

विद्यापीठाच्या ऑक्टोबर- नोव्हेंबर हिवाळी सत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ५६४ अभ्यासक्रमांपैकी ५५१ अभ्यासक्रमांचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले आहेत. बी. एड., एम. एड., इंटिग्रेटेड सत्र पहिले, एम. फार्मा सत्र पहिले आणि दुसरे या अभ्यासक्रमांचे निकाल परीक्षा व मूल्यमापन मंडळाने सोमवारी जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com