
अंबाबाई मंदिर एलईडी स्क्रीन
04588
...
अंबाबाई मंदिरात एलईडी
स्क्रीन उभारणी कामाला प्रारंभ
कोल्हापूर ः श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरमध्ये भाविकांना मंदिर आवारात व परिसरात देखील देवीचे थेट दर्शन होण्यासाठी बारा बाय आठ फुटाचे एलईडी स्क्रीन कायमस्वरूपी बसवले जाणार आहेत. या कामाला आजपासून प्रारंभ झाला. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या विशेष प्रयत्नातून कामासाठी निधी मिळाला आहे. देवस्थान समितीचे प्रशासक, जिल्हाधिकारी राहुल रेखवार, सचिव सुशांत बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाला प्रारंभ झाला. यावेळी समितीचे लेखापाल धैर्यशील तिवले यांच्या उपस्थितीत यंत्रणेचे पूजन झाले. मंदिर आवारात, दक्षिण दरवाजा, उत्तर दरवाजा,बिंदू चौक अशा चार ठिकाणी हे स्क्रीन बसवले जाणार आहेत. या माध्यमातून देवीच्या थेट दर्शनाबरोबरच कोल्हापुरातील पर्यटनाबाबत माहिती दिली जाणार आहे.