
पंचगंगेचा अहवाल प्रदूषण मंडळाकडे
जिल्हा परिषदेचा पंचगंगा
नदी प्रदूषण अहवाल सादर
कोल्हापूर, ता.२३ ः जिल्हा परिषदेचा पंचगंगा नदी प्रदूषण अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवण्यात आला. नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी वस्तुस्थिती दर्शवणारा अहवाल बनवणे आवश्यक होते. त्याप्रमाणे हा अहवाल बनवण्यात आला आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका, औद्योगिक विकास महामंडळ यांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळ यांना वस्तुस्थिती मांडणारा अहवाल बनण्याची सूचना देण्यात आली होती. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेने याचा विस्तुत अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर केला. सर्व अहवाल एकत्रित करून ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांनी सर्वेक्षण करून हा अहवाल बनवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हा अहवाल राज्याच्या सचिवांना सादर करण्यात येईल.