बाजार समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समिती
बाजार समिती

बाजार समिती

sakal_logo
By

लोगो
...
अधिकार नसताना कर्मचाऱ्यांना सेवेत केले कायम

बाजार समिती : जिल्हा सहकार उपनिबंधकांकडे माजी संचालकांची तक्रार

कोल्हापूर, ता. २३ ः जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीत यापूर्वी असलेल्या अशासकीय प्रशासक मंडळाला अधिकार नसताना कर्मचाऱ्यांना बाजार समितीच्या सेवेत कायम केले. वादग्रस्त ठरलेल्या त्या २९ कर्मचाऱ्यांना सेवेत अभय दिले. त्यामुळे बाजार समितीचे कोट्यवधींचे नुकसान झाले, या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास नुकसानीची वसुली करावी, अशा आशयाची तक्रार जिल्हा सहकार उपनिबंधक कार्यालयाकडे माजी संचालक ॲड. किरण पाटील, कृष्णात पोवार, नयन प्रसादे यांनी केली आहे.
जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीत ६ आॅगस्ट २०२० ते २०२२ या कालावधीत अशासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्त होते. सहकार कायदा पोटनियमानुसार अशासकीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती होती. या मंडळाला बाजार समितीचे दैनंदिन कामकाज पाहणे एवढेच मर्यादित अधिकार होते. या समितीत कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, अशा सूचना पणन संचालकांनी अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करतानाच दिल्या होत्या. तसेच त्या सूचना पत्रात अशासकीय प्रशासक मंडळाने उपसमिती नियुक्ती करू नये, नवीन नोकर भरती करू नये, पदोन्नती विषय हाताळू नयेत, गाळे वाटप व बांधकाम, रिकामे प्लॉट पूर्व परवानगी शिवाय विक्री करू नये असे धोरणात्मक निर्णय घेऊन नयेत, असे पणन संचालकांनी सुचित केले होते.
तरीही अशासकीय मंडळाने काही धोरणात्मक निर्णय घेतले. त्यातून बाजार समितीचे अर्थिक नुकसान झाले त्याची रक्कम अध्यक्ष व सदस्य यांच्याकडून वसुली करावी, अशी मागणी या तक्रारीत आहे.

बाजर समितीच्या पूर्व संचालक मंडळाने बाजार समितीत नोकरभरती करण्यासाठी जाहिरात दिली होती. त्याला राज्यभरातून ४ हजारांवर उमेदवारांनी अर्ज दिले होते. ते बाजूला ठेवून तत्कालीन संचालक मंडळाने आपल्या नात्यातील २९ कर्मचारी भरती केली. ती वादग्रस्त ठरली होती. अशा वादग्रस्त भरतीतील त्या कर्मचाऱ्यांना मुदत वाढीचा ठराव करून अशासकीय मंडळाने अभय दिले. बाजार समिती ३७ रोजंदारी कर्मचारी होते. यातील काही कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा ठराव ही याच मंडळाच्या काळात झाला. त्यामुळे दोन्ही कर्मचाऱ्याच्या वेतनाचा बोजा बाजार समितीवर पडला. ती रक्कम पाच कोटींच्या घरात जाते. याशिवाय बेकायदेशीरपणे गाळे बांधकाम अशा कामांना मंडळाने हिरावा कंदील दाखवला. यासाठी अशासकीय मंडळातील सर्वच सदस्य राजी नव्हते, तरीही कागलच्या एका संचालकाने राष्‍ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या नावावर बाजार समितीचा कारभार जणू एक हातीच चालवला. तोच संचालक नव्याने झालेल्या निवडणुकीत निवडून आला आहे.