पोलिस नाईक रणजीत देसाई यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस नाईक रणजीत देसाई यांचा सत्कार
पोलिस नाईक रणजीत देसाई यांचा सत्कार

पोलिस नाईक रणजीत देसाई यांचा सत्कार

sakal_logo
By

chd241.jpg
04616
किटवडे : पोलिस नाईक रणजित देसाई यांचा सत्कार भरमूअण्णा पाटील यांनी केला. अशोक कदम, बाळ देसाई आदी उपस्थित होते.
-------------------------------------
पोलिस नाईक रणजित देसाई यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २४ : समाजाप्रती सहानुभूती दर्शविणाऱ्या आणि आपल्या कर्तव्यात कसूर न करता प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची समाज नेहमी जाणीव ठेवतो, असे मत माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी व्यक्त केले.
किटवडे (ता. चंदगड) येथील पोलिस नाईक रणजित देसाई यांच्या सत्काराचे गावातर्फे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. देसाई यांना आतापर्यंत ५२ बक्षिसे मिळाली आहेत. पोलिस महासंचालकांतर्फे नुकताच त्यांचा सत्कार झाला. याची दखल घेत ग्रामस्थांनी देसाई यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. भारतीय जनता युवा मोर्चाचे अशोक कदम, विमा प्रतिनिधी अशोक दळवी यांनी देसाई यांच्या कार्याचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना देसाई म्हणाले, की माझे कुटुंबीय, गाव आणि तालुक्याचे नाव उंचावले जाईल, असेच कार्य करीत राहणार आहे. बाळ देसाई, दत्तात्रय पाटील, गणपत सावंत, सागर देसाई, नामदेव पाटील, युवराज देसाई आदी उपस्थित होते. नारायण गावडे यांनी सूत्रसंचालन केले. नेताजी सुभेदार यांनी आभार मानले.