शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात

शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात

chd244.jpg
04619
बागिलगे : शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत माहिती देताना प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे. शेजारी तहसीलदार राजेश चव्हाण, बीडिओ चंद्रकांत बोडरे आदी.
----------------------------------
शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात
प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे; बागिलगे येथे शासन आपल्या दारी उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २४ : शासनाच्या विविध योजनांची माहिती समाजातील तळागाळापर्यंत पोहोचून त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात आहे. त्याचा उपयोग करून घेणे गरजेचे असल्याचे मत प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी व्यक्त केले.
बागिलगे (ता. चंदगड) येथे आयोजित महसूल व वन विभागातर्फे शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. राज्य विक्रीकर अधिकारी गोपाळ पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांपासून समाजातील तळागाळातील घटक वंचित राहतो त्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे सांगितले. प्रांताधिकारी वाघमोडे म्हणाले, ‘शासनाच्या योजना राबवताना काही तांत्रिक अडचणी येतात. भाऊबंदकीतील वादामुळे कागदपत्रे सादर करताना येणाऱ्या अडचणीमुळे लाभ मिळत नाही. त्यामुळे असे वाद सामोपचाराने मिटवले पाहिजे. त्यामुळे एकोपा नांदून सगळ्यांनाच संधीचा लाभ मिळेल.’
तहसीलदार राजेश चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला व नागरिकांचा सन्मान केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद पठाणे, कृषी अधिकारी शरद पोळ उपस्थित होते. निवृत्त प्राचार्य एस. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सदानंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तलाठी विठ्ठल शिवनगेकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com