
डॉ. घाळी महाविद्यालयात फूड फेस्टीवलला प्रतिसाद
4733
...
डॉ. घाळी महाविद्यालयात
फूड फेस्टिव्हलला प्रतिसाद
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त प्रो-बायोटिक फूड फेस्टिव्हलला प्रतिसाद मिळाला. आरोग्यासाठी लाभदायी असणारे जिवाणू व भरड धान्याचा वापर करून तयार केलेले खाद्यपदार्थ फेस्टिव्हलमध्ये मांडले होते. उत्कृष्ट खाद्यपदार्थांना प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्या हस्ते पारितोषिके दिली. मृणाल हिर्डेकर, राहुल नार्वेकर, पूजा संभोजी, रचना दोरुगडे, विशाल गोरे, रोहित पाटील, अजित जाधव यांच्या संघांनी अनुक्रमे पारितोषिक पटकावले. मल्टिगेन कढी, नाचणी कांजी, राईस कांजी, नाचणी इडली, प्रो-बायोटिक राईस, चॉकलेट यासह देशातील विविध प्रांतामधील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांचा प्रदर्शनात समावेश होता. फेस्टिव्हलचे उद्घाटन संचालक किशोर हंजी यांच्या हस्ते झाले. विभागप्रमुख प्रा. महेश कदम, डॉ. दत्ता पाटील, डॉ. शशिकांत संघराज, डॉ. सरला आरबोळे, प्रा. विद्या सोनाळकर, प्रा. प्राजक्ता कुंभार, प्रा. वैष्णवी सुतार, प्रा. तेजश्री कानकेकर, प्रा. सिया हिडदूग्गी, प्रा. तेजस्विनी वागवेकर, प्रा. निकिता भोईटे आदी उपस्थित होते.