ज्वलनशील पदार्थांच्या गोदामांची तपासणी आवश्‍यक

ज्वलनशील पदार्थांच्या गोदामांची तपासणी आवश्‍यक

ज्वलनशील पदार्थांच्या गोदामांची तपासणी आवश्‍यक
इचलकरंजी, ता. २४ ः इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूरमधील फटाक्यांच्या गोदामामध्ये स्फोट झाल्याची घटना मंगळवारी घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. अशा दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शहर परिसरामध्ये असलेल्या ज्वलनशील पदार्थांच्या गोदामांची तपासणी करणे आवश्यक बनले आहे. लोकवस्तीत असलेली गोदामे निर्जनस्थळी स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे.
कबनूरमध्ये फटाक्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामामध्ये स्फोट होऊन एकास प्राण गमवावे लागले. स्फोट इतका जबरदस्त होता की त्या गोदामाच्या भिंती पडल्या तर छपर उडाले होते. परिसरातील घरांनाही इजा झाली होती. ज्वलनशील पदार्थ साठवण करून ठेवण्यात येणाऱ्या गोदामांना अनेक विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. त्याची पडताळणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
फटाके निर्माण करण्यात येणारी गोदामे पूर्वी शहर व मानवी वस्त्यापासून दूर होती. मात्र गावांचा विस्तार वाढत गेला तसे हे फटाके तयार करणारे कारखाने वस्तीच्या मधोमध आले. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण होत आहे. फटाके निर्माण करताना दारूसोबत विविध केमिकल लागत असल्याने आगीची संभावना वाढत असते. त्यामुळे आवश्यक सुरक्षा साधन ठेवणे गरजेचे आहे. याची संबंधित विभागाकडून तपासणी आवश्यक बनली आहे.
---
फटाका विक्रीसाठी परवाना घेतेवेळी त्यासाठी अनेक नियम आणि अटी आखून दिलेल्या आहेत. त्यात विक्रीच्या ठिकाणी ठराविक प्रमाणापेक्षा जास्त फटाके साठवून ठेवणे नियमबाह्य धरले जाते. मात्र, हा महत्त्वाचा नियमच अनेक फटाका व्यावसायिकांनी पायदळी तुडवल्याचे दिसून येते. त्यासोबतच या दुकानांपैकी बऱ्याच ठिकाणी आवश्यक असलेल्या सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या दिसून येत नाही.
--
परिसरातील फटाके गोदामांची परवाने तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सुरक्षा साधनांचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
-शरद पाटील, अपर तहसीलदार, इचलकरंजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com