कचरा प्रकल्पात आग धुमसती

कचरा प्रकल्पात आग धुमसती

04784
कचरा प्रक्रिया प्रकल्पातील आग अजूनही धुमसतीच
कोल्हापूर, ता. २४ ः गेल्या आठवड्यापासून कचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचऱ्याला लागलेली आग अजूनही धुमसत आहे. त्यातून धूर मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असून, परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.
गेल्या आठवड्यापासून कचऱ्याला लागलेली आग मोठी भडकली होती. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे शेजारील रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. तेथील नागरिकांचेही आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झाले होते. त्यासाठी अग्निशमन दलाकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. तरीही आग पूर्णतः आटोक्यात आली नाही. गेल्या काही दिवसांपासून धुमसणाऱ्या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत आहे. त्याचा वास तीव्र असून, परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. आरोग्य विभागाकडूनही दररोज कचऱ्यावर पाणी मारले जात आहे. तरीही आग पूर्ण थांबलेली नाही. तिथे स्प्रिंकलर यंत्रणा बसविण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com