Fri, Sept 22, 2023

गोकुळ संघ अध्यक्ष
गोकुळ संघ अध्यक्ष
Published on : 24 May 2023, 3:12 am
‘गोकुळ’ ची आज अध्यक्ष निवड
कोल्हापूर : जिल्हा दूध उत्पादक सहकारी (गोकुळ) संघाच्या नूतन अध्यक्षांची निवड गुरुवारी (ता. २५) होणार आहे. ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांना दोन वर्षांसाठी अध्यक्ष पदासाठी संधी मिळणार आहे. डॉ.महेश कदम निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. गुरुवारी सकाळी १२ वाजता ‘गोकुळ’च्या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात ही निवड होणार आहे. काही दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, के.पी.पाटील, ए.वाय. पाटील यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांनी श्री. डोंगळे यांच्या नावाला एक मताने पसंती दिली होती. उद्यापासून ते पुढील दोन वर्षांसाठी ‘गोकुळ’चे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील.