
कंत्राटीकरणाविरोधात मोर्चा
कंत्राटीकरण
विरोधी धरणे
आंदोलन सोमवारी
कोल्हापूर : कंत्राटीकरण रद्द करा, कायम नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत, पगार, महागाईभत्ता, इएसआय, फंड, पेन्शन, ग्रॅच्युईटी मिळालीच पाहिजे, या मागण्यासाठी सोमवारी (ता. २९) जिल्हाधिकारी कार्यालय येथे कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे धरणे आंदोलन आहे. यात कामगार बंधू-भगिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे.
कंत्राटीकरणामुळे कंत्राटी कामगारांचे जीवन भयानक होत आहे. त्याला किमान वेतन देत नाहीत, महागाई वाढली तर आपोआप वाढणारा महागाई भत्ता देत नाहीत. त्याचे ‘इएसआय’चे पैसे भरत नाहीत, त्याचे फंडाचे पैसे भरत नाहीत. पाच वर्षे काम केल्यानंतरही काम सोडताना त्याला ग्रॅच्युईटी देत नाहीत. कायदे आहेत; पण कंत्राटदार कायदे पाळत नाहीत. उलट मागणी केली तर कामावरून काढण्याची धमकी देत आहेत. यामध्ये कंत्राटी कामगारांचे अमानुष शोषण होत आहे. कंत्राटदार मालामाल होत आहेत. मालकांचे फावत आहे. सरकारी उच्च पदस्थ अधिकारी कामगारांच्या पिळवणूकीकडे डोळेझाक करत आहेत. राजकीय पुढारी कामगारांच्या या पिळवणुकीत सहभागी आहेत. अनिल लवेकर, अतुल दिघे, दिलीपदादा जगताप, सदाशिव निकम, सुभाष जाधव यांनी कृती समितीतर्फे हे आवाहन केले आहे.