दिलबहार चा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिलबहार चा विजय
दिलबहार चा विजय

दिलबहार चा विजय

sakal_logo
By

फोटो 04802
--

लोगो-
अटल चषक फुटबॉल

दिलबहार तालीम मंडळाचा विजय 
---
उत्तरार्धात ‘उत्तरेश्वर’कडून आक्रमक चाली; मात्र गोल नाही
कोल्हापूर, ता. २४ : तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळ संघाने उत्तरेश्वर तालीम संघावर ३ विरुद्ध ० गोलफरकाने विजय मिळविला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे. तत्पूर्वी, ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव, ॲड. प्रवीण कदम, ॲड. डी. एस. कदम, हरी पटेल यांच्या उपस्थितीत सामन्याचे उद्‌घाटन झाले.   
दिलबहार संघाने आक्रमक चढाया करीत सामन्यावर वर्चस्व राखले. सुरुवातीला ‘दिलबहार’च्या चढाया ‘उत्तरेश्वर’च्या बचाव फळीने उत्कृष्टरीत्या थोपवून धरल्या. मात्र, सामन्याच्या २१ व्या मिनिटाला ‘दिलबहार’च्या रोहन दाभोळकरच्या पासवर स्वयंम साळोखेने गोल नोंदवत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली; तर पाठोपाठ २८ व्या मिनिटाला तुषार पुनाळकरच्या पासवर स्वयंम साळोखे याने वैयक्तिक व संघासाठी दुसऱ्या गोलची नोंद केली.  
उत्तरार्धात उत्तरेश्वर संघाकडून आक्रमक चाली रचण्यात आल्या. मात्र, यात यश आले नाही. दिलबहार संघाने अधिक आक्रमक पवित्रा घेतला. ७६ व्या मिनिटाला राज अली याने मैदानी गोल करीत ‘दिलबहार’साठी तिसऱ्या गोलची नोंद केली. अखेरपर्यंत हाच गोलफरक कायम राहत सामना एकतर्फी जिंकला.  

चौकट
उत्कृष्ट असे ः
सामनावीर ः स्वयंम साळोखे : दिलबहार 
लढवय्या ः  इंद्रजित शिंदे : उत्तरेश्वर 

चौकट
आजचा सामना
दुपारी ४ ः बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध सोल्जर ग्रुप