बाजार समिती सभापती निवड

बाजार समिती सभापती निवड

लोगो
...

बाजार समितीची आज
सभापती - उपसभापती निवड

कोल्हापूर, ता. २४ ः शेती उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची गुरुवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता बैठक होत आहे. शाहू मार्केट यार्डातील समितीच्या सभागृहात ही बैठक होणार असून, यात सभापती व उपसभापती पदाची निवड होणार आहे. सहायक जिल्हा सहकार उपनिबंधक प्रदीप मालगावे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्षाचे प्रतिनिधी निवडून आले आहेत, तर विरोधी गटातील केवळ दोन उमेदवार निवडून आले आहेत. बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची आमदार हसन मुश्रीफ यांनी नुकतीच बैठक घेऊन बाजार समितीत चांगले काम करून दाखवा, असा सल्ला दिला आहे. कॉंग्रेसचे भारत पाटील- भुयेकर, जनसुराज्यचे प्रकाश देसाई, राष्ट्रवादीचे सूर्यकांत पाटील या तिघांची नावे सभापतीपदासाठी चर्चेत आहेत.
...

फेरचौकशीचे काय होणार?
जुन्या संचालक मंडळात काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्षाचे प्रतिनिधी होते. त्याच संचालक मंडळाच्या काळात बाजार समितीत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्या. तेव्हा चौकशी झाली. चौकशीत गैरव्यवहाराचा ठपका ठेवला गेला. पुढे विविध कायद्याच्या तांत्रिक पेचात चौकशी सापडली. त्यानंतर अशासकीय प्रशासक मंडळ बाजार समितीवर कार्यरत होते. अशात निवडणूक लागली. नवीन सहकार उपनिबंधक आले. त्यांनी बाजार समितीच्या त्या संचालक मंडळात झालेल्या गैरकारभाराची फेरचौकशी करण्याचे आदेश गेल्या महिन्यात दिले. या चौकशीसाठी दोन महिन्यांची मुदत दिली. त्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्या चौकशीचे काम अद्यापि झालेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com