इचल ः कुत्रा चावा सुधारीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल ः कुत्रा चावा सुधारीत
इचल ः कुत्रा चावा सुधारीत

इचल ः कुत्रा चावा सुधारीत

sakal_logo
By

इचलकरंजीत भटक्या
कुत्र्यांचा १५ जणांना चावा

इचलकरंजी, ता. २४ ः कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तब्बल १७ जणांना आज आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांनी जीवघेण्या हल्ल्यात शहरातील पंधरा तर ग्रामीण भागातील दोन जणांना जखमी केले आहे. यामध्ये तीन बालकांचा समावेश असून शहरात भटक्या कुत्र्यांचे हल्ले सुरूच आहेत. परिणामी, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
डॉ. आंबेडकर नगर, गणेश नगर, नेहरू नगर, कागवाडे मळा, पी. बा. पाटील मळा, आमराई रोड, सनी कॉर्नर, टाकवडे वेस, लिगाडे मळा, तांबे माळ आदी भागात मोकाट कुत्र्यांनी ज्येष्ठांसह लहान मुले अशा एकूण १५ जणांचा चावा घेतला. तर ग्रामीण भागातील कुत्र्याच्या हल्ल्यातील दोन रुग्ण आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
संकेत भंडारे (वय २०, रा. रुकडी, ता.हातकणंगले), अरमान शेख (वय ९१, रा. आंबेडकरनगर इचलकरंजी), ऋषिकेश दुर्गुळे (२१, रा. गणेशनगर), अरविंद गेजगे (८४, रा. नेहरूनगर), बाळू टारे (७७, रा. नांदणी, ता.शिरोळ), शकुंतला यादव (५०, रा. जांभळी, ता.शिरोळ), सुमन भोई (४८, रा. टाकवडे), आनंदी पुजारी (४०, रा. कागवाडे मळा), काजल भोसले (३०, पी.बा.पाटील मळा), संजय माळी (३८), गुणवंता खेऊडे (६५, दोघे रा. आमराई रोड), सर्जेराव कोळी (५४, कबनूर), संदीप लोखंडे (रत्नदीप वसाहत, कबनूर), हौसाबाई खोत (५८, रा. इचलकरंजी), सुशिला कोळी (६८, रा. टाकवडे वेस), अमोल येरेढाले (३४, रा. लिगाडे मळा), राजेंद्र मजले (तांबे मळा) अशी आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्याची नावे आहेत. कुत्रा चावलेले नागरिक तसेच त्यांना दाखल करण्यासाठी आलेले नातेवाइक व मित्रमंडळींनी आयजीएम रुग्णालयात गर्दी झाली होती.
-------
कोट
‘आमराई मळा, राजवाडा चौक येथे चावा घेतलेल्या कुत्र्यांमध्ये रेबीजचे लक्षण दिसून येत होते. त्यांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. इतर भटक्या कुत्र्यांबाबतही उपाययोजना करण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहे.
सुनीलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी, महापालिका