इचलकरंजीत वसंत वर्षा संगीत महोत्सव

इचलकरंजीत वसंत वर्षा संगीत महोत्सव

इचलकरंजीत वसंत वर्षा संगीत महोत्सव
२ जूनपासून प्रारंभ ः नामवंत कलाकारांचा सहभाग

इचलकरंजी, ता. २५ ः महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, पंडीत बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ व इचलकरंजी महापालिका यांच्या संयुक्त सहकार्याने २ व ३ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात वसंत वर्षा संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे.
महोत्सवात राहुल देशपांडे, इंद्राणी मुखर्जी, सानिया पाटणकर हे कलाकार (गायन) तर राकेश चौरसिया (बासरी), पुष्पराज कोष्टी (सूरबहार) तर सुधांशु कुलकर्णी व सारंग कुलकर्णी (हार्मोनियम जुगलबंदी) अशा संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकारांकडून कला सादर केली जाणार आहे. याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली.
शास्त्रीय संगीताचा भारतभर प्रसार करणाऱ्या इचलकरंजीच्या पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी मंडळामार्फत संगीत महोत्सवात घेतला जातो. यंदाच्या महोत्सवाचे महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतीक कार्य विभाग हे मुख्य आयोजक असून, पंडीत बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ मुख्य समन्वयक आहेत. इचलकरंजी महापालिकेचेही सहकार्य आयोजनास मिळाले आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे व संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय विभिषण चवरे यांच्या मार्गदर्शनानुसार महोत्सव होत आहे. पत्रकार परिषदेस उमेश कुलकर्णी, गिरीष कुलकर्णी, बापू तारदाळकर, अनिल भिडे, संतोष साधले, विजय राजापूरे, गौरी पाटील, चित्कला कुलकर्णी आदी उपस्थित होते.
---
प्रेक्षकांना विनामुल्य प्रवेश
प्रदीर्घ कालावधीने इचलकरंजीत होत असलेल्या संगीत महोत्सवासाठी रसिक प्रेक्षकांना विनामुल्य प्रवेश दिला जाणार आहे. अतिशय रंगतदार असा हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास सहपरिवार उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com