गिजवणेत शासन आपल्या दारी उपक्रम

गिजवणेत शासन आपल्या दारी उपक्रम

gad252.jpg
04890
गिजवणे : शासन आपल्या दारी उपक्रमाच्या प्रारंभप्रसंगी पौर्णिमा कांबळे, नितीन पाटील, रमेश पाटील, लक्ष्मण शिंदे, आदित्य पाटील, अर्जून रेडेकर आदी उपस्थित होते.
---------------------------------------------------
गिजवणेत शासन आपल्या दारी उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे शासन आपल्या दारी सर्वसामान्यांच्या विकासासाठी घरोघरी अभियानातंर्गत ग्रामपंचायत व कोल्हापूरच्या सामाजिक न्याय विभागातर्फे घरोघरी अभियानाचा उपक्रम राबवला. लक्ष्मी मंदिरात हा कार्यक़्रम झाला.
सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी नागरिकांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून सामाजिक न्याय विभागाचे सुरेखा डवर, सविता कांबळे, माधुरी चव्हाण यांनी वैयक्तिक लाभाच्या योजना व डॉ. बाबासाहेब आंबेकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडील योजनांची माहिती दिली.
सरपंच पौर्णिमा कांबळे, उपसरपंच नितीन पाटील, सदस्य लक्ष्मण शिंदे, आदित्य पाटील, भूषण गायकवाड, ग्रामविकास अधिकारी अर्जून रेडेकर, तंटामुक्त अध्यक्ष संतोष चव्हाण, रमेश पाटील, आर. बी. कांबळे, माजी सरपंच रंजना चव्हाण, निलेश कांबळे, नागोजी चव्हाण, आर. बी. पाटील, सुनिल कांबळे, अशोक मोहिते आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com