बाजार समिती सभापती निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समिती सभापती निवड
बाजार समिती सभापती निवड

बाजार समिती सभापती निवड

sakal_logo
By

बेकायदेशीर काम होऊ
देणार नाही ः भारत पाटील

कोल्हापूर ,ता. २५ ः बाजार समितीच्या कारभारात यापूर्वी जे कामकाज झाले त्याची माहिती घेऊ. शेतकरी अडते, व्यापारी, माथाडींसह प्रत्येक विभागातील अडचणी, समस्या समजून घेऊन त्यावर अभ्यास करून मार्ग काढला जाईल मात्र कोणत्याही परस्थितीत बेकायदेशीर कारभार होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही नुतन सभापती भारत पाटील-भुयेकर यांनी आज येथे दिली.
प्रदीप मालगावे म्हणाले,‘बाजार समितीत बऱ्याच कालावधीनंतर संचालक मंडळ निवडून आले. शेतकऱ्यांसाठी काम करण्याची तुमची जबाबदारी आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील शेतीमालावर येथील बाजार समिती चालते. जिल्ह्यातील शेतीमाल यावा, बाजार समितीचा लौकीक वाढावा यासाठी काम करावे. शासकीय सदस्य संचालक मंडळात असतो त्यांनाही बैठकीला बोलवावे’
व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार वळूंज म्हणाले, ‘बाजार समिती शेतकऱ्यांची आहे तसेच व्यापारी तितकाच महत्वाचा आहे. शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांनाही सुविधा द्याव्यात. त्यांच्यासाठी सवतीची भूमिका घेऊ नका.’
सुर्यकांत पाटील म्हणाले ‘अशासकीय प्रशासक मंडळानेबाजार समितीचे उत्पन्न १० कोटींवरून १६ कोंटीवर नेले. नव्या संचालक मंडळाने हे उत्पन्न ३० कोटीवर नेऊयात.’
माजी सभापती संभाजी पाटील, सुभाष चौगुले, कुमार आहुजा, बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

चौकट
सभापतिपदाचा मान पिता-पुत्रांना
सहकार नेते कै. बाबासाहेब पाटील भुयेकर यांनी समितीचे दिर्घकाळ सभापतीपद भूषवले. त्यांचे चिरंजीव भारत पाटील यांनाही सभापतीपद मिळाले. त्यामुळे पित्रा-पुत्राना एका सहकारी संस्थेच्या मानाच्या पदावर विराजमान होण्याची संधी लाभली. हा योगायोगही चर्चेचा ठरला.