बाजार समिती सभापती निवड

बाजार समिती सभापती निवड

04942

बाजार समिती सभापतिपदी भारत पाटील
बिनविरोध निवड; उपसभापती ‘जनसुराज्य’चे शंकर पाटील

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ,ता. २५ ः कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे भारत बाबासाहेब पाटील-भुयेकर तर उपसभापतीपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे शंकर दादासो पाटील यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रदिप मालगावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नूतन संचालकांच्या बैठकीत या बिनविरोध निवडी झाल्या.
बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने १८ पैकी १६ जागा जिंकल्या होत्या, तर विरोधी गटाला एकच जागा मिळाली. त्यामुळे सत्तारूढ गट पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यात यशस्वी झाला. सभापती व उपसभापती पदासाठी नूतन संचालकांची बैठक झाली. तत्पूर्वी सर्किट हाऊस येथे सत्ताधारी आघाडीच्या संचालकांची बैठक झाली. त्यानंतर सर्व संचालक बाजार समितीत आले. निवडणूक निर्णय अधिकारी मालगावे, बाजार समिती सचिव जयवंत पाटील यांच्या उपस्थितीत संचालकांची बैठक सुरू झाली. त्यात भारत पाटील यांचा सभापती पदासाठी तर शंकर पाटील यांचा उपसभापती पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला. मालगावे यांनी अन्य कोणी इच्छुक आहात का, अर्ज दाखल करणार आहात का अशी विचारणा केली. मात्र, कोणीही दुसरे नामनिर्देशन पत्र दिले नाही. यावरून सभापतीपदी भारत पाटील तर उपसभापती पदी शंकर पाटील यांची निवड झाल्याचे मालगावे यांनी घोषीत केली.
त्यानंतर संचालकांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय‌. पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, युवराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, प्रदीप पाटील-भुयेकर, वैभव सावर्डेकर, संचालक राजाराम चव्हाण, प्रकाश देसाई, प्रा‌. शेखर देसाई, बाळासाहेब पाटील, सूर्यकांत पाटील, पैलवान संभाजी पाटील, पांडुरंग काशीद, संदीप वरंडेकर, सुयोग वाडकर, शिवाजीराव पाटील, नाना कांबळे, पांडुरंग काशीद, कुमार आहुजा, संचालिका मेघा देसाई, सोनाली शरद पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com