शिवराज्याभिषेक सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळा

शिवराज्याभिषेक सोहळा

sakal_logo
By

पन्हाळ्यावर शिवसेना ठाकरे
गटातर्फे शिवराज्याभिषेक सोहळा

कोल्हापूर, ता. २५ ः शिवसेना ठाकरे गटातर्फे यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा पाच व सहा जूनला पन्हाळगडावर साजरा होणार आहे. पन्हाळा येथील शिवमंदिरात दिवसभर विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांनी दिली.
शिवमंदिरात असणाऱ्या शिवछत्रपतींच्या मूर्तीला दक्षिण प्रदेशातील बेंगलोर फोर्ट, किल्ले साजरा-गोजरा, वेल्लूर, जिंजी व तंजावर तसेच महाराष्ट्रातील किल्ले राजगड, सिंधुदुर्ग, सर्जाकोट व राजकोट या किल्ल्यांवरून आणलेल्या पाण्याने जलाभिषेक व दुग्धाभिषेक होईल. पालखी सोहळा, मर्दानी खेळ, गडपूजन, गोंधळ व पोवाडे असे विविध कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यंदा शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत असून, शिवसैनिक आणि कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.