चंदगड- दड्डी बस पूर्ववत सुरु करण्याची मागणी

चंदगड- दड्डी बस पूर्ववत सुरु करण्याची मागणी

चंदगड- दड्डी बस पूर्ववत
सुरु करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २६ ः तालुक्याच्या पूर्व भागातील कर्नाटक सीमेवरील गावांना जोडणारी चंदगड- दड्डी बस पूर्ववत सुरु करावी अशी त्या विभागातील नागरीकांची मागणी आहे. कोरोनात बंद झालेली ही बस अद्याप सुरु केलेली नाही. परीसरातील दहा- बारा गावांतील नागरीकांच्या सोयीच्या दृष्टीने ती पूर्ववत सुरु करावी अशी मागणी आहे.
कर्नाटक सीमेलगत असलेल्या चिंचणे, कामेवाडी, नरगट्टे, यर्तेनहट्टी परीसरातील नागरीकांचा कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांशी संपर्क येतो. शाळा, महाविद्यालयांना जाणारे विद्यार्थी, आरोग्य सेवेसाठी जाणारे रुग्ण, शासकीय कामकाजासाठी चंदगडला जाणारे नागरीक, नातेसंबंधामुळे होणारा प्रवास यासाठी चंदगडहून कामेवाडीमार्गे दड्डी जाणारी बस सोयीची होती. अनेक वर्षे ही गाडी सुरु होती. त्याला प्रवाशांचा प्रतिसादही चांगला होता. परंतु कोरोनात ही गाडी बंद झाली. त्यानंतर सर्व सेवा पूर्ववत होत असताना एसटी महामंडळाने ही गाडी अद्याप सुरु केलेली नाही. नागरीकांची सोय विचारात घेता ती पूर्ववत करावी अशी मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com