गोकुळच्या अध्यक्षपदी
अरुण डोंगळे बिनविरोध

गोकुळच्या अध्यक्षपदी अरुण डोंगळे बिनविरोध

05019
कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अरुण डोगळे यांचा सत्कार करताना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेश कदम. शेजारी विश्‍वास पाटील, बाबासाहेब चौगले आदी.

गोकुळच्या अध्यक्षपदी
अरुण डोंगळे बिनविरोध
बंद पाकिटातून नावाची प्रथा बंद

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता २५. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्‍या अध्यक्षपदी अरुण गणपतराव डोंगळे यांची आज बिनविरोध निवड झाली. दुग्धचे विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडीसाठी विश्वासराव पाटील सूचक तर नविद मुश्रीफ अनुमोदक होते. गोकुळ एमआयडीसी येथील गोकुळच्या मुख्य कार्यालयात निवड प्रक्रिया झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी डॉल्बीच्या तालावर गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यावर्षी प्रथमच बंद पाकिटातून नाव पाठविण्याची प्रथा खंडित झाली.
गोकुळ अध्यक्षपदाचा विश्‍वास पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर डोंगळे यांना संधी दिली जाणार होती. विश्‍वास पाटील अध्यक्ष होताना दोन वर्षानंतर डोंगळे यांना संधी दिली जाणार होती. त्यानूसार आज डोंगळे यांनी अध्यपदाची सुत्रे घेतली. दरम्यान, सकाळपासून कार्यकर्त्यांनी गोकुळच्या मुख्य कार्यालयात डॉल्बीसह हजेरी लावली. ‘डोंगळे समर्थक’ असे नमूद केलेल्या टोप्या कार्यकर्त्यांनी घातल्या होत्या. डोंगळे यांची चारचाकीमधून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतील प्रत्येक वाहनाच्या काचेवर अरुण डोंगळे यांचे चित्र साकारले होते. निवडीनंतर गोकुळच्या दारात कार्यकर्ते आणि समर्थकांनी ‘मै हु डॉन’ गाण्यावर ठेका धरत मशिनद्वारे गुलालाची उधळण केली. याच सोबत डोंगळे यांच्या नावाचा जयघोष करत कार्यकर्ते कागल मार्गे घोटवडे येथे रवाना झाले. दरम्यान, ही निवड दोन वर्षांसाठी असणार आहे. दोन वर्षानंतर एक वर्षासाठी नवीन संचालकाला संधी दिली जाणार आहे. मात्र, ही संधी कोणाला मिळणार याचीही यावेळी चर्चा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com