
दमसा पुरस्कार
M04940
साहित्यातून समाजाला धिराचा मार्ग दाखवला जातो
डॉ. माणिकराव साळुंखे; दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पुरस्कारांचे वितरण
कोल्हापूर ता. २५ ः ‘साहित्य हा समाजाचा आरसा असून, समाजातील भविष्यकालीन घटनांचा उगम साहित्यात दिसतो. साहित्यिकांच्या लेखनातून समाजाचे भावताल टिपले जाते. त्यातून समाजाला सावध होण्याचा, धीराचा मार्ग दाखवला जातो. अशा साहित्यातून समाज जागृती घडते. अशा साहित्यिकांना मिळणारे पुरस्कार साहित्य निर्मितीचे बळ वाढवणारे आहेत. त्यासाठी असे पुरस्कार देण्याचे दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेने केलेले कार्य मौलीक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आज येथे केले.
येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे अध्यक्षस्थानी होते.
२०२२ ते २३ मधील उत्कृष्ठ साहित्य निर्मितीसाठी पुरस्कारांचे वितरण झाले. पुरस्कार असे (कंसात पुस्तकाचे नाव)
लेखक वसंत गायकवाड (तथागत गौतम बुध्द)- देवदत्त पाटील पुरस्कार ,जयवंत आवटे (बारा गावचे संचित) शंकर खंडू पाटील पुरस्कार, सीताराम सावंत (हरवलेल्या कथेच्या शोधात) आण्णा भाऊ साठे पुरस्कार, विनायक होगाडे (डियर तुकोबा) कृ.गो.सुर्यवंशी पुरस्कार, आबासाहेब पाटील (घामाची ओल धरून- कविता संग्रह) शैला सायनारकर पुरस्कार, कविता ननवरे (कविता संग्रह ) चैतन्य माने पुरस्कार, वंदना हुलबत्ते बालवांडमय पुरस्कार.
याशिवाय विशेष पुरस्कारामध्ये प्राचार्य डॉ. रा. तु, भगत लिखित संत गाडगे बाबा महाराज समग्र ग्रंथ, व्यंक्काप्पा भोसले लिखित राजर्षी शाहू महाराज आणि भटके विमुक्त, अच्युत माने (जीवन रंग), डॉ. बी. एम. हिर्डेकर (पाषण पालवी), सुभाष ढगे - पाटील (लढवय्या) यांच्या सह १८ जनांना विशेष पुरस्काराने गौरविले. कार्याध्यक्ष दि. बा. पाटील, उपाध्यक्ष गौरी भोगले, कार्यवाह डॉ. विनोद कांबळे, सदस्य पाटलोबा पाटील, विक्रम राजवर्धन आदी उपस्थित होते.
दमसाचे अध्यक्ष भिमराव धुळुबुळ यांनी स्वागत केले. डॉ. प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले. विलास माळी यांनी आभार मानले.
चौकट
कवी संमेलन ही रंगले
डॉ. दिलिप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारप्राप्त कवींचे कवी संमेलन झाले. दिपक बोरगावे पुणे, कविता मुरूमकर सोलापूर, हबीब भंडारे औरंगाबाद, गोविंद पाझरेकर सावंतवाडी, राजेंद्र दास बार्शी, केशव देशमुख नांदेड, किर्ती पाटस्कर मुंबई यांनी विविध मुद्दांवर भावनिक साद घालणाऱ्या कवितांचे सादरीकरण करीत उपस्थितांची वाहवा मिळवली.