आजरा कारखान्याची अंतिम मतदार यादी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा कारखान्याची अंतिम मतदार यादी जाहीर
आजरा कारखान्याची अंतिम मतदार यादी जाहीर

आजरा कारखान्याची अंतिम मतदार यादी जाहीर

sakal_logo
By

आजरा कारखान्याची अंतिम मतदार यादी जाहीर
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २५ ः आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची अंतीम मतदार यादी जाहीर झाली आहे. आजरा तहसलीदार कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय आजरा, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा निवडणुक अधिकारी तथा प्रादेशीक सह संचालक कार्यालय कोल्हापूर व आजरा साखर कारखान्यावरील नोटीस बोर्डावर आज ही यादी लावली आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणुक होताच निवडणुकीचा कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे. आजरा साखर कारखान्याच्या विद्यमान संचालकांची मंडळाची मुदत मे २०२१ मध्ये संपली आहे. कोरोना व अन्य कारणांमुळे कारखान्याची निवडणूक लांबणीवर पडली. त्यामुळे २० जूनपुर्वी मुदत संपलेल्या कारखान्याची निवडणूक घ्यावी त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर तयारी करावी, असे प्रादेशिक सह संचालक साखर कोल्हापूर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आजरा साखर कारखान्याच्या `ब` वर्ग संस्था सभासद प्रतिनिधींची ठराव दाखल करण्याची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण झाली होती.
एकूण १६५ संस्था सभासदांपैकी १२० संस्थांनी ठराव दाखल केले. कारखान्याकडे अ वर्ग उत्पादक सभासद २५ हजार १८१ आहेत. सात हजार ४३८ ब वर्ग अनुत्पादक व्यक्ती सभासद आहेत. त्यांचा अंतिम मतदार यादीत समावेश केला आहे. मतदार यादी प्रसिद्धीनंतर कधीही निवडणूक जाहीर होवू शकते.