गोकुळ भाषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ भाषण
गोकुळ भाषण

गोकुळ भाषण

sakal_logo
By

चाचणी लेखापरिक्षणातून काहीही निष्पन्न होणार नाही ः डोंगळे
कोल्हापूर, ता. २५ : गोकुळ संघासाठी वीस लाख लिटर दूध संकलनाच्या मोठ्या आव्हानाकडे जात आलेले नाही. संघाची उलाढाला साडेतीन हजार कोटीवरुन पाच हजार कोटींपर्यंत वाढवावी लागेल. विश्‍वास पाटील अध्यक्ष असताना राज्यात आपली सत्ता होती. आता अनेक अडचणी आहेत. गोकुळमधील चाचणी लेखापरिक्षणाची तिसरी वेळ आहे. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. कर नाही त्याला डर कशाला हे लक्षात ठेवून गोकुळमध्ये आता केवळ एक अध्यक्ष नव्हे तर सर्व संचालक अध्यक्ष म्हणून काम करतील, असे मत नूतन अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आज व्यक्त केले.
माजी अध्यक्ष विश्‍वास पाटील म्हणाले, ‘गोकुळची उलाढाल वाढली आहे. कारभारही चांगला झाला आहे. विविध उत्पादनांना चांगला प्रतिसाद आहे.’
संचालक किसन चौगले, रणजीत पाटील, अजित नरके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासाहेब खाडे, शशिकांत पाटील-चुयेकर, बयाजी शेळके, मुरलीधर जाधव यांनी माजी अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अभिजीत तायशेटे, नविद मुश्रीफ, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, युवराज पाटील, श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आदी उपस्थित होते.

चौकटी

‘तोच संचालक पुढचा अध्यक्ष होणार’
दोन वर्षानंतर पुढचा अध्यक्ष होण्यासाठी केवळ मी इच्छुक आहे. मला अध्यक्षपद पाहिजे म्हणून चालणार नाही. तर, जो संघाला वेळ देतो. संघाचे हित जोपासतो. संघाच्या उन्नतीसाठी रात्र-दिवस एक करतो. त्याच संचालकाला पुढचा अध्यक्ष करणार आहे. हे डोक्यात ठेवून संचालकांनी कामाला लागावे. नाहीतर विश्‍वास पाटील म्हणतात तसे मी पुन्हा येईन.. असं काहीतर होवू शकते, अशी टिपणी डोंगळे यांनी करताच उपस्थितांना हसू आवरले नाही.

‘परत मला सूचक केलं तर करायचं काय? ’
डोंगळे म्हणाले, ‘अध्यक्ष पदासाठी अर्ज भरायचा होता. यावेळी अर्जावर माजी अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी कोठे सही केली हे पाहून घेतले. उमेदवाराच्या ठिकाणी पाटील यांनी आणि सूचक म्हणून माझी सही घेतली तर करायचे काय? असं म्हणून मी अध्यक्षपदाचा फॉर्म निरखून पाहिला. त्यांनतर आबाजींची फाईल आली. त्यावेळी सूचक म्हणूनच सही केल्याचे पाहिले. चुकून झालं म्हणून परत आबाजी अध्यक्ष व्हायचे.’

‘अमरिषसिंह घाटगे यांनी कायम नाही म्हणावे’
संजयबाबा घाटगे आणि माझे जवळचे संबंध आहेत. अमरिषसिंह घाटगे यांना विरोधी पक्षनेतेच व्हायचे असेल तर त्यांची इच्छा. पण, त्यांनी आम्हाला कायम नाही म्हणावे. म्हणजे आम्ही कायम विजयी होवू, असे डोंगळे यांनी सांगताच एकच हशा पिकला.

‘तुम्ही दोघेच खुर्ची वाटून घ्या’
संचालक रणजीत पाटील यांनी मावळते अध्यक्ष म्हणून विश्‍वास पाटील यांचा उल्लेख केला. हाच धागा पकडत विश्‍वास पाटील यांनी सूर्य जरी मावळला तरी तो पुन्हा उगवतो, हे लक्षात ठेवावे अशी मिश्‍किल टिपणी केली. रविंद्र आपटे अध्यक्ष होत असताना आता मी तुम्हाला खुर्ची देत आहे. पुन्हा मी ही खुर्ची घेणार आहे. आताही डोंगळेंना खूर्ची दिली असली तरीही मी पुन्हा येईन असे पाटील यांनी नमूद करताच ज्येष्ठ संचालक युवराज पाटील यांनी आम्ही बाजूला राहतो, तुम्ही दोघेच खुर्ची वाटून घ्या’ असे मत व्यक्त केले. यावेळी सर्वच संचालकांना हसू रोखता आले नाही.
---
स्वतंत्र लावा

कोणाच्या तरी सांगण्यावरुन नव्हे बेधडक
स्वभाव कायम ठेऊन अध्यक्षपद सांभाळावे

शौमिका महाडिक; सोशल मीडियावरून दिल्या शुभेच्छा
गोकुळचे नूतन अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरुन गोकुळचा कारभार न करता, आपला बेधडक स्वभाव कायम ठेऊन अध्यक्षपदावर कार्यरत रहावे. गोकुळमधील चांगल्या निर्णयाला आणि कामाला पाठिंबा दिला जाईल. चुकीच्या कामाला विरोध केला जाईल. दूध उत्पादकांच्या न्याय-हक्कासाठी एका विशिष्ट प्रवृत्तीविरोधात सुरु असलेला लढा थांबणार नाही, अशा शुभेच्छा आणि इशारा गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी आपल्या फेसबुक पेजवरून दिला आहे. शौमिका महाडिक आजच्या अध्यक्ष निवडीला उपस्थित नव्हत्या. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या.