कागल, मुरगूड आरोग्यसेवा सक्षम करा ः समरजीतसिंह घाटगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल, मुरगूड आरोग्यसेवा सक्षम करा ः समरजीतसिंह घाटगे
कागल, मुरगूड आरोग्यसेवा सक्षम करा ः समरजीतसिंह घाटगे

कागल, मुरगूड आरोग्यसेवा सक्षम करा ः समरजीतसिंह घाटगे

sakal_logo
By

05030

कागल, मुरगूड व गडहिंग्लज
आरोग्य केंद्रे सक्षम करावीत
---
समरजितसिंह घाटगे; प्रस्ताव देण्याचे आवाहन
कोल्हापूर, ता. २५ ः कागल, मुरगूड व गडहिंग्लज शहरातील आरोग्य केंद्रातील बेडची संख्या वाढविण्यासह इतर अद्यावत सुविधा देणे आवश्यक आहे. याबाबतचे प्रस्ताव आरोग्य विभागाने तत्काळ द्यावेत. पावसाळी अधिवेशनात या तिन्ही विभागातील आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधा अधिक अद्यावत व सक्षम करण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी याबाबतची बैठक घेतली.
जिल्हाधिकारी डॉ.राहुल रेखावार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘कागल येथे ३० बेडचे रुग्णालय आहे. येथे ट्रामा केअर सेंटरसह ७० बेडचे रुग्णालय उभारणे आवश्यक आहे. मुरगुड येथील ३० बेडचे रुग्णालय ५० बेडचे करणे गरजेचे आहे. गडहिंग्लज येथील १०० बेड असलेल्या रुग्णालयाची क्षमता वाढवून ते २०० बेडचे करणे आवश्यक आहे.’ याबाबत बैठकीत चर्चा झाली. सदरचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागास दिल्या. तसेच या तिन्ही शहरातील पोलिस ठाणायाच्या सुसज्ज व अद्यावत इमारतींसह पोलिस कर्मचाऱ्यांसाठीच्या निवासस्थानासाठीचेही प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या. गडहिंगलज व मुरगुड येथील विश्रामधाम सुसज्ज करण्याबरोबर कागल येथे थांबा, आणखी एक नवीन सर्किट हाऊसचा प्रस्ताव पाच जूनपर्यंत देण्याबाबतच्या सूचना दिल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, प्रवीण जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, डॉ. रवींद्र बल्लूरगी, डॉ गिरीश कांबळे, कामगार आयुक्त विशाल घोडके उपस्थित होते.

चौकट
कागलमध्ये लवकरच डायलेसिस सुविधा
कागल शहरात डायलिसिस सुविधा नसल्यामुळे रुग्णांना निपाणी, कोल्हापूरला जावे लागते. त्यासाठी कागलमधील सरकारी दवाखान्यात दोन डायलिसिस मशीन उपलब्ध करूनआठवड्यातील ठराविक दिवस ही सुविधा लवकर सुरू करण्याचेही ठरले.