पहिल्या दिवशी ३२२९९ परीक्षार्थी

पहिल्या दिवशी ३२२९९ परीक्षार्थी

पहिल्या दिवशी कॉपी करणाऱ्या १६ विद्यार्थ्यांना पकडले
उन्हाळी सत्रातील परीक्षा सुरू; विविध दहा अभ्यासक्रमांचे ३२२९९ परीक्षार्थी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः शिवाजी विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल या उन्हाळी सत्रातील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा गुरूवारपासून सुरू झाल्या. पहिल्या दिवशी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण ३२,२९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या दरम्यान गैरप्रकार (कॉपी) करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील १६ विद्यार्थ्यांना भरारी पथकाने पकडले. वर्णनात्मक ऑफलाईन असे या परीक्षांचे स्वरूप आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाने बीएड. सत्र एक आणि दोन, बी. फार्मा सत्र एक आणि दोन या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत.
बी. कॉम., बी. ए., बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, आर्टस अँड बॅचलर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ आर्टस (ड्रेस मेकिंग अँड फॅशन को-ऑर्डिनेशन), कॉमर्स बँक मॅनेजमेंट, सोशल वर्क, कॉमर्स (आयटी), बॅचलर ऑफ आर्टस डिफेन्स स्टडी, डिझाईन या अभ्यासक्रमांची परीक्षा झाली. त्यासाठी एकूण ३२,२९९ परीक्षार्थींनी हजेरी लावली. दरम्यान, या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने भरारी पथकांची स्थापना केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भरारी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये गुरूवारी १६ विद्यार्थी कॉपी करताना सापडले. त्याची नोंद परीक्षा प्रमाद समितीमार्फत करण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली. विद्यापीठाने हिवाळी सत्रात परीक्षांमधील एकूण ५५७ अभ्यासक्रमांचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले आहेत.

चौकट
संकेतस्थळ पूर्ववत
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास व्हायरसचा ॲटक झाला होता. त्यामुळे संकेतस्थळ बंद ठेवले होते. रात्री उशिरापर्यंत तांत्रिक प्रक्रिया सुरू होती. गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजता प्रशासनाकडून संकेतस्थळ पूर्ववत करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com