आजरा ः पोलीस वृत्त

आजरा ः पोलीस वृत्त

आजऱ्यातील घरफोडीमधील संशयित ताब्यात
आजरा ः येथील आपटे कॉलनीत झालेल्या घरफोडीतील एका संशयिताला आजरा पोलिसांनी ताब्यात घेतले. रजाक अब्दुल मुजावर (रा. नांदरे, ता. मिरज, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. आजरा शहरात गस्त घालत असताना नाकाबंदीदरम्यान संबंधित संशयित मिळाला आहे. मुजावर हा संशयितरीत्या मोटारसायकलवरून फिरत होता. पोलिसांनी त्याच्याकडील मोटारसायकलची चौकशी केली व कागदपत्राबाबत विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळवला व मुजावरकडील गाडी चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. दहा दिवसांपूर्वी आपटेनगरमध्ये सुनील गणपती नाईक यांच्या बंद घराचा कडीकोयडा उचकटून दागिने व मोटारसायकल पळवली होती. त्यांची ही मोटारसायकल आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com