डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा १०० टक्के निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा १०० टक्के निकाल
डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा १०० टक्के निकाल

डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा १०० टक्के निकाल

sakal_logo
By

05056
श्रुती जोशी
05055
यशवंत भोसले

‘डी. वाय. पाटील ज्युनिअर’चा
१०० टक्के निकाल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः येथील डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा काल १०० टक्के लागला. विज्ञान शाखेचा विद्यार्थी यशवंत चंद्रकांत भोसले याने ९६ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकविला आहे. स्वरणिका कराळे हिने याने ९२ टक्के गुणासह द्वितीय क्रमांक मिळवला असून तिला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. प्रतिक पांडुरंग चव्हाण याने ८६.५० टक्के गुणासह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. हर्षवर्धन कवठेकर, दीपश्री पाटील, धुरा कदम यांनी गर्भशास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. वाणिज्य शाखेत श्रुती सचिन जोशी हिने ९५.८३ टक्के गुणासह प्रथम क्रमांक मिळवला असून तिला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. निनाद जोशी आणि मृणाल महाडेश्वर यांनी ९५.६७ टक्के गुणासह द्वितीय क्रमांक मिळवला असून दोघांनीही अकौंटन्सी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. अथर्व खटावकर याने ९४.८३ टक्के गुण मिळवत तृतीय स्थान मिळवले. र्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, महाविद्यालयाचे सल्लागार अशोकराव देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील यांनी अभिनंदन केले.