कोल्हापूर

कोल्हापूर

05057
....

शिक्षक समृद्ध झाला तरच विद्यार्थी समृद्ध होईल

प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले; क्रिएटिव्ह टीचर्स फोरमचे शैक्षणिक विचारमंथन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २८ ः ‘शिक्षणाची गुणवता वाढवायची असेल तर शिक्षकांची गुणवता वाढली पाहिजे; तरच विद्यार्थ्यांची गुणवता वाढेल. शिक्षक समृद्ध झाला तरच विद्यार्थी समृद्ध होईल’, असे मत डी.आर.माने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले यांनी व्यक्त केले. क्रिएटिव्ह टीचर्स फोरमच्या वतीने आयोजित शैक्षणिक विचारमंथन सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा विभाग प्रमुख डॉ.बी.एम.हिर्डेकर होते.
ज्येष्ठ साहित्यिक, प्राचार्य डॉ.जी.पी.माळी, दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, राजाराम महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.रघुनाथ कडाकणे, मोहनदास गांधी विचारमंचचे अध्यक्ष प्रा.टी.के.सरगर, कागलचे गटशिक्षणाधिकारी डॉ.गणपती कमळकर, करवीरचे शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार, विजयश्री फौंडेशनचे जॉर्ज क्रुज, विद्यार्थी चित्रपट चळवळ चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव, अतुल शिंदे, वाचन कट्टाचे युवराज कदम आदी उपस्थित होते.
डॉ.गणपती कमळकर यांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने ‘ऑनलाईन शिक्षण पद्धती’ या ग्रंथास पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार झाला. दीपक जगदाळे यांनी स्वागत केले. विजय एकशिंगे यांनी प्रास्ताविक, अतुल शिंदे, राजू पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com