शिवाजी विद्यापीठातील आठ विद्यार्थी ‘उत्कृष्ट युवा संसदरत्न’

शिवाजी विद्यापीठातील आठ विद्यार्थी ‘उत्कृष्ट युवा संसदरत्न’

05058

आठ विद्यार्थी ‘उत्कृष्ट युवा संसदरत्न’
कोल्हापूर, ता. २५ ः शिवाजी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या सोळाव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेअंतर्गत विद्यापीठातील आठ विद्यार्थ्यांची ‘उत्कृष्ट युवा संसदरत्न’ म्हणून निवड झाली. यामध्ये पवन पाटील, असिया जमादार, अनमोल पाटील, श्रेया म्हापसेकर, प्रतीक्षा पाटील, सिमरन घाशी, ऋतिका धनगर, प्रतीक्षा कांबळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये सात विद्यार्थिनींचा समावेश आहे.
संसदीय कार्य मंत्रालयामार्फत बक्षीस वितरण समारंभासाठी विद्यापीठातील समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांच्यासह निवड झालेल्या आठ विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथे निमंत्रित करण्यात येणार असल्याचे केंद्रीय संसदीय कार्यमंत्रालयाचे उपसचिव ए. बी. आचार्य यांनी जाहीर केले. या राष्ट्रीय संसद स्पर्धेसाठीच्या संघ निवडीचा अंतिम निकाल कालांतराने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेमध्ये स्वच्छ भारत, कृषी, आरोग्य, महिला सक्षमीकरण,नवीन शैक्षणिक धोरण, आर्थिक धोरण, संरक्षण इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा झाली. या स्पर्धेस निरीक्षक म्हणून उपसचिव आचार्य, शिक्षणतज्ज्ञ प्रा. एस. बी. देओसकर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

चौकट
‘नेतृत्व कौशल्याचा विकास’
या स्पर्धेचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहित करणे इतकाच नसून युवकांमध्ये नेतृत्व कौशल्याचा विकास करण्याचा आहे, असे आचार्य यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते युवा संसद स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com