
वर्ल्ड कपसाठी कोल्हापूरची सोनम
5064 - सोनम मस्कर
ज्युनिअर वर्ल्ड कपसाठी
गारगोटीच्या सोनमची निवड
कोल्हापूर, ता. २५ ः येथील नेमबाज सोनम मस्कर हिची जूनमध्ये जर्मनी येथे होणाऱ्या ज्युनियर वर्ल्ड कप शूटिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तिने वर्षभर केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे निवड झाली आहे. केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत व दिल्ली येथे झालेल्या भारतीय निवड चाचणी एक व दोन यामध्ये मिळून तिने सरासरी ६२८ गुण मिळवले व भारतीय संघात स्थान पक्के केले. ती दहा मीटर एअर रायफल प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिची उत्तर प्रदेश येथे सुरू होणाऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेसाठीही निवड झालेली आहे. दरम्यान, सोनम गारगोटी गावची रहिवासी असून कोल्हापूरमध्ये वेध रायफल व पिस्तूल शूटिंग अकॅडमीमध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाज व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या राधिका बराले- हवालदार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.