नागावात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन

नागावात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन

नागाव येथे आजपासून
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. २६ : येथील सिद्धार्थ क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळातर्फे ५५ किलो वजनी गटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा मुलांच्या व महिला निमंत्रित खुल्या गटात होत आहेत. शनिवार (ता. २७) व रविवार (ता. २८) रोजी नागाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सिद्धार्थ मैदानावर या स्पर्धा होत आहेत. व्हर्साटाईल ग्रुपच्या संचालिका बिनाताई जानवाडकर व ज्येष्ठ उद्योजक सुरेंद्र जैन यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी पाच वाजता या स्पर्धांचे उद्‍घाटन होत आहे, अशी माहिती सिद्धार्थ क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास पंधरा हजार रुपये रोख व चषक द्वितीय क्रमांक येणाऱ्या संघास दहा हजार रुपये रोख व चषक आणि तृतीय येणाऱ्या संघास सात हजार रुपये रोख व चषक, असे बक्षीस देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त आदर्श संघ, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड अशी विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी सिद्धार्थ क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे लखन कांबळे, अजय सर्वोदय, स्वप्निल राजाध्यक्ष व जीवन कांबळे यांच्याशी संपर्क साधून आपल्या संघाची नोंदणी करावयाची आहे, असे करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com