
रोटरीतर्फे युवा गौरव पुरस्काराचे वितरण
ich264.jpg
05073
इचलकरंजी ः रोटरी क्लब सेंट्रलतर्फे नासीर बोरसादवाला यांच्या उपस्थितीत युवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा झाला.
-------------
‘रोटरी’तर्फे युवा गौरव पुरस्काराचे वितरण
इचलकरंजी, ता. २६ ः सन्मानप्राप्त युवक- युवतींकडून आज होत असलेले कार्य आणि त्यातून मिळणारी ऊर्जा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. समाजात आज अनेकदा विदारक परिस्थिती आढळते. त्यासाठी युवा वर्गाची निश्चितपणे मदत होऊ शकेल आणि सामाजिक दृष्टीने त्यांनी ती करावी, असे प्रतिपादन रोटरी प्रांत ३१७० चे नियोजित प्रांतपाल नासीर बोरसादवाला (कोल्हापूर) यांनी केले.
आंतरराष्ट्रीय रोटरीतर्फे मे हा युवा महिना म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार येथील रोटरी क्लब सेंट्रलतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या युवा गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. पूजा दानोळे (क्रीडा), स्नेहल माळी (सामाजिक), ऋचा सारडा- बियाणी (शैक्षणिक), अनिल भुतडा (व्यावसायिक) आणि विवेक सुतार (सांस्कृतिक) यांचा गौरव केला. सर्वांनी मनोगतात यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला.
सहायक प्रांतपाल पन्नालाल डाळ्या यांनी मनोगत व्यक्त केले. हसमुख पटेल यांनी ‘फोर वे टेस्ट’चे वाचन केले. वाहतूक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ उपस्थित होते. अध्यक्ष अशोक जैन यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रशांत कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. अमर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव श्रीकांत राठी यांनी आभार मानले.