
इचलकरंजी हायस्कूल द्वितीय
ich265.jpg
05075
इचलकरंजी : रस्सीखेच स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा हायस्कूलतर्फे गौरव केला.
इचलकरंजी हायस्कूल द्वितीय
इचलकरंजी : जिल्हा क्रीडा कार्यालय सांगली व रॉयल क्रीडा ॲकॅडमीतर्फे घेतलेल्या विभागीय रस्सीखेच स्पर्धेत इचलकरंजी हायस्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला. खंडेराजुरी, जि. सांगली येथे १४, १७ व १९ वयोगटाच्या मुला मुलींच्या स्पर्धा झाल्या. स्पर्धेत १४ वर्ष वयोगटामध्ये इचलकरंजी हायस्कूलच्या मुलींच्या संघाने रस्सीखेच स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेत पूर्वा माने, अक्षरा पाटील, अर्पिता वायचळ, श्रेया रुग्गे, अक्षरा सटाले, तन्वी शिंदे, मनस्वी घुबडे, प्रचीती इंगळे, प्रांजली शेटाने या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंना क्रीडा प्रमुख व्ही. एस. गुरव, डी. वाय. कांबळे, बी. एम. थोरवत, सुहास पोवळे यांचे मार्गदर्शन लाभले.
--------------------------
इचलकरंजीत मेट्रोलॉजी कार्यशाळा
इचलकरंजी : जागतिक मेट्रोलॉजी दिनानिमित्त इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन येथे मेट्रोलॉजी या विषयावर कार्यशाळा झाली. महर मेट्रोलॉजी इंडिया प्रा. लि. इंडियाचे कार्यकारी संचालक दीपयान दास, नॅशनल मॅनेजर सचिन बन्सल यांनी उद्योजकांना मेट्रोलॉजी या विषयावर मार्गदर्शन केले. व्यवसायात मेट्रोलॉजीच्या तंत्रज्ञानामुळे उत्पादित होणारे सूक्ष्म टूल्स कसे दर्जेदार बनवता येतात याचे चित्रफिती व प्रत्यक्ष उपकरणाद्वारे प्रात्यक्षिक दाखवले. कोल्हापूर विभागाचे नितीन कॅलीब्रेशन सर्व्हिसेसचे नितीन सावंत यांनी उपकरणाची देखभाल कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. विक्रम बुचडे, प्रकाश सातपुते, काशिनाथ जगदाळे, शिवाजी लोखंडे आदी उपस्थित होते.
-----------------
05076
दगडू कांबळे यांची निवड
इचलकरंजी : स्वराज्य क्रांती सेना पॅथर आर्मी या संघटनेच्या कामगार आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी दगडू गणपती कांबळे यांची निवड केली. यावेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी तानाजी शिंदे, कार्याध्यक्षपदी गुलाब अत्तार तर सचिवपदी दिनकर थोरात यांची निवड केली. निवडीची पत्रे संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संतोष आठवले, राज्य सल्लागार जयसिंग कांबळे यांच्याहस्ते दिली.