हलकर्णीमध्ये नेत्र तपासणी शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हलकर्णीमध्ये नेत्र तपासणी शिबीर
हलकर्णीमध्ये नेत्र तपासणी शिबीर

हलकर्णीमध्ये नेत्र तपासणी शिबीर

sakal_logo
By

gad264.jpg
05136
हलकर्णी : कलाम फाऊंडेशनतर्फे नेत्र तपासणी शिबिर झाले. यावेळी योगिता संगाज, डॉ. कमरुद्दीन शेख, डॉ. हारुण चौगुले, विजय शेरवी आदी उपस्थित होते.

हलकर्णीमध्ये नेत्र तपासणी शिबिर
नूल : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे कुल्लोळी नेत्रालय, सांगली व कलाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उर्दू विद्यामंदिरात झाले. सरपंच योगिता संगाज अध्यक्षस्थानी होत्या. नेत्रालयाचे डॉ. कमरुद्दीन शेख, डॉ. हारुण चौगुले, सईद मुजावर, मौलाना मुबारक नाईकवाडे यांच्या पथकाने काम पाहिले. ११३ रुग्णांची तपासणी करून १३ जणांना मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी सांगली येथे नेले. विजय शेरवी, अल्लीसो कादरभाई, नजीर बागवान, उपसरपंच सलीम यमकनमर्डी, शिवानंद मठपती, असगर बागवान, आप्पासाहेब यमकनमर्डी, मौला हावळे, इमामसाहेब पानारी आदी उपस्थित होते. बाबालाल अतार यांनी प्रास्ताविक केले. ख्वाजा मालदार यांनी आभार मानले.
--------------------------------------------------
gad265.jpg
05137
भडगाव : क्रिकेट प्रशिक्षक महादेव चिलमी यांच्या सत्कारप्रसंगी राजू खमलेट्टी, भीमराव पट्टणकुडी, उदय पुजारी, रवींद्र चिलमी आदी उपस्थित होते.

प्रशिक्षक चिलमी यांचा भडगावात सत्कार
गडहिंग्लज : कोल्हापूर येथे झालेल्या तीन दिवसीय ट्रेनिंगमध्ये प्रशिक्षक म्हणून सन्मानित केल्याबद्दल भडगावचा खेळाडू महादेव चिलमी यांचा भडगाव क्रिकेट असोसिएशन व ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. राजू खमलेट्टी यांच्या हस्ते हा सत्कार झाला. चिलमी यांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांना कोच म्हणून सन्मानित करून प्रशस्तिपत्र देण्यात आले. बीसीसीआय लेव्हल थ्रीचे कोच प्रदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण झाले. भीमराव पट्टणकुडी, पोलिस पाटील उदय पुजारी, शांताराम गोरे, अप्पा माने, मारुती सावळेकर, मारुती नाईक, राजू रेगडे, प्रकाश सावेकर, रवींद्र चिलमी, भैया हारळीकर, अक्षय गुरुले आदींसह क्रिकेटप्रेमी व खेळाडू उपस्थित होते.