एसटी बातमी

एसटी बातमी

एसटी कर्मचाऱ्यांच्या नेहमी पाठीशी राहू

सतेज पाटील ः एसटी कर्मचारी कॉंग्रेस संघटनेच्या मेळाव्यात ग्वाही

कोल्हापुर ,ता. २६ ः ‘ राज्यातील जनतेचा प्रवास सुखाचा करण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. अशा एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी नेहमी राहील,’ अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस संघटनेच्या कामगार मेळावा जिल्हा कॉंग्रेस कमिटी येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण अध्यक्षस्थानी होते. संघटचे सरचिटणीस श्रीरंग बरगे प्रमुख पाहुणे होते.
आमदार पाटील म्हणाले की, ‘ आमचे सरकार नेहमीच एसटी कर्मचारी वर्गाच्या पाठीशी राहिले असून कोविड काळात वेतनासाठी आमच्या सरकारने भरीव निधी उपलब्ध करुन दिला. एसटी कामगारांना कोविड लस प्राधान्याने दिली असे अनेक चांगले निर्णय घेतले. शिवाय संप कालावधीत आपल्या संघटनेने पाच महीने कामावर उपस्थित राहून जनतेची सेवा केली हे संघटनेचे कार्य कौतुकास्पद आहे.’
श्रीरंग बरगे म्हणाले ,‘ काम करुन देखील एसटी कर्मचारी वर्गाचे वेतन वेळेवर मिळत नाही. सध्याच्या सरकारकडून एसटी महामंडळास सापत्नपणाची वागणूक दिली जाते. सध्या महामंडळास उत्पन्न वाढीसाठी लालपरी या साध्या गाड्यांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एसटीचे बजेट हे राज्य शासनाच्या बजेटमध्ये विलीन करावे.’
सचिन चव्हाण म्हणाले,‘ ‘ एसटी ही सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी असून ती टिकली पाहिजे. आपल्या संघटनेचे कार्य कौतुकास्पद असून जिल्हा व शहर कॉंग्रेस नेहमी आपल्या पाठीशी राहिल.’
संघटनेचे विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी स्वागत केले. संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. सुभाष वगरे यांनी सूत्रसंचालन केले .काका कुलकर्णी यांनी आभार मानले.
मेळाव्यास ज्येष्ठ नेते बबनराव थोरात, अध्यक्ष अय्याज चौगुले, कार्याध्यक्ष सुनील घोरपडे, अरविंद पाटील, रणजीत काटकर, बाळासो माने, शिवाजी डांगे, सूरज तमायचे, सचिन मुंडाळे, सचिन मलके, वैशाली पाटील, त्रिवेणी पाटील, सुनीता कोडोलीकर, दीपाली येलबेली, दिलशान बागवान, माधुरी केसरकर, अश्विनी चौगुले, सोनाली कोळी आदी उपस्थित होते.

चौकट
या मेळाव्यात संघटनेचे सेवानिवृत होत असलेले पदाधिकारी सर्वश्री मारुती पुजारी, नामदेव भोसले, राजेंद्र भोसले, बाळासो सालोखे, मारुती पोवार, दिलीप पाटील तसेच गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्या बद्दल संताराम जाधव व प्रामाणिकपणे प्रवाशांचा दोन लाखाचा ऐवज परत केल्याबद्दल एम. ए. मणेर यांचा सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com