Sun, October 1, 2023

संक्षिप्त- डॉ. चंद्रशेखर पाटील
संक्षिप्त- डॉ. चंद्रशेखर पाटील
Published on : 26 May 2023, 1:14 am
05184
...
युरोपियन परिषदमध्ये
डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे शोधनिबंध
कोल्हापूर ः फ्रान्समधील पॅरिस येथे नुकतीच युरो-पीसीआर २०२३ जागतिक हृदयरोग तज्ज्ञांची परिषद झाली. या परिषदेमध्ये जगभरातून अकरा हजार पाचशे हृदयरोग तज्ज्ञ उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्रातून या परिषदेमध्ये डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी आठ आव्हानात्मक शोधनिबंध सादर केले. ‘युरो- पीसीआर'' ही ‘युरोपियन असोसिएशन ऑफ परक्युटॅनियस इंटरव्हेशन'' या युरोपियन शिखर संघटनेची वार्षिक परिषद आहे. डॉ. पाटील यांना एका सत्रामध्ये चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली.