बारावी-व्हाईट आर्मी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारावी-व्हाईट आर्मी
बारावी-व्हाईट आर्मी

बारावी-व्हाईट आर्मी

sakal_logo
By

05191, 05192, 05193, 05194, 05195, 05196, 05197, 05198, 05199

व्हाईट आर्मीच्या रणरागिणींची
आपत्कालीन सेवा बजावत बाजी

कोल्हापूर, ता. २६ ः एखादी आपत्ती आली की तत्काळ संपर्क होतो आणि किमान काही दिवसांच्या मोहिमेसाठी ही मंडळी जातात. आपत्ती आलेल्या ठिकाणी इमाने-इतबारे सेवा बजावतात. त्याशिवाय शहरात नवरात्रोत्सव, जोतिबाची यात्रा, गणेशोत्सव या काळातही ही मंडळी रस्त्यावर असतात...एकीकडे सामाजिक भान जपत ही सेवा देत असतानाच त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेतही आपण भारी असल्याचे दाखवून दिले आहे. येथील व्हाईट आर्मीच्या रणरागिणींनी बारावीच्या परीक्षेतही घवघवीत यश मिळवले आहे.
सायली शिंदेने ६३ टक्के, अश्विनी माटेने ६७ टक्के, निकिता जाधवने ६१ टक्के, श्रेया ठोंबरेने ६५ टक्के, वैष्णवी इंगळेने साठ टक्के, वैष्णवी गुरवने ६३ टक्के, सानिका गजबरने ६२ टक्के, स्नेहल नलवडेने ७३ टक्के, श्वेता तेगनाळेने ६७ टक्के गुण मिळवले. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात ‘सीपीआर’मध्ये झालेला संप असेल किंवा आपत्ती काळातील प्रशिक्षणावेळीही ही मंडळी कैक दिवस सेवा देत होती.
............
फक्त फोटोओळ ः 05212
------