Thur, Sept 21, 2023

टुडे २ क
टुडे २ क
Published on : 26 May 2023, 1:33 am
05071
कृष्णनाथ, आविष्कार, अद्वैत
यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर, ता. २६ ः कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे झालेल्या कॉडेट व ज्युनिअर गटातील राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या संघाने यश मिळविले. पेठवडगाव येथे नुकत्याच या स्पर्धा झाल्या. ज्यूदो असोसिएशनचे खेळाडू कृष्णनाथ पोतदार याला सुवर्णपदक, आविष्कार पाटील, अद्वैत पोतदार यांना रौप्यपदके मिळाली. ओंकार खवरे याने कांस्यपदक पटकावले. कृष्णनाथ, आविष्कार, अद्वैत यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांना ज्यूदो असोसिएशनचे अण्णासाहेब पाटोळे, अपर्णा पाटोळे, वृषाली लिंग्रस यांचे मार्गदर्शन लाभले.
............