शेतकरी कामगार पक्ष -सत्कार

शेतकरी कामगार पक्ष -सत्कार

05233
...

शेतकरी कामगार पक्षाकडून पोलिसांचा सत्कार


कोल्हापूरः शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीच्यावतीने पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटधोंड व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका बापाने आपल्या मुलांना कोल्हापुरात सोडून पळ काढला. यानंतर पोलिस निरीक्षक कटकधोंड यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत तातडीने शोध मोहीम सुरु करून मुलांच्या आजी-आजोबांशी संपर्क केला. मुले सुखरूप त्यांच्या ताब्यात दिली. या माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या कार्याची दखल घेत शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीच्यावतीने कटधोंड व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ‘आम्ही आमचे कर्तव्य करत असतो. अशाप्रसंगी पालकांनीही दक्ष राहिले पाहिजे,’ असे कटकधोंड यांनी सांगितले. यावेळी बाबूराव कदम, वैशाली सूर्यवंशी, गीता जाधव, प्रिया जाधव, योगिता पाटील, सचिन जाधव व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com