शिवाजी पेठ विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी पेठ विरोध
शिवाजी पेठ विरोध

शिवाजी पेठ विरोध

sakal_logo
By

05228

शिवाजी पेठेतील मैदानावरील
बांधकामाला नागरिकांचा विरोध

महापालिकेचा केला निषेध
कोल्हापूर, ता. २६ : शिवाजी पेठेतील राजे संभाजी तरुण मंडळाच्या मागील मैदानावर सुरू असलेल्या हॉलच्या बांधकामाला स्थानिक नागरिकांनी आज विरोध केला. तसेच महापालिकेच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
आमदार फंडातून हॉलचे बांधकाम सुरू आहे. मैदानावर इमारत बांधल्याने खेळण्यावर मर्यादा येणार आहेत. नागरिकांना मैदान रिकामे हवे आहे. त्यासाठी नागरिक एकवटले आणि बांधकामाला विरोध केला. महापालिकेचे अधिकारी आल्यावर उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने नागरिकांनी महापालिकेचा निषेध करत''इमारत नको मैदान हवे, मैदान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा दिल्या. आंदोलनात अनिल चव्हाण, छाया पोवार, अजित चव्हाण, संगीता बचाटे, पद्मजा जाधव, सरिता गडकरी, लता जगताप, योगिता कोतेकर, साईप्रसाद हराळे, गणेश कोतेकर, आदित्य हराळे, निखिल बचाटे, अवधूत मेढे, रोहन गवळी आदी सहभागी झाले होते.