
शिवाजी मार्केट
रस्त्यावर बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांना
जागा देण्याची प्रशासकांकडे मागणी
कोल्हापूर, ता. २६ ः छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील भाजीमंडईत परिसरातील रस्त्यावर बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांना जागा मिळावी, सुविधा द्याव्यात, अशा मागणी आज भाजी विक्रेत्यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.
भाजी मंडईतील जागा रिकामी असून, त्या जागेवर इतर भाजी विक्रेत्यांना बसवले जावे. तिथे जाण्यासाठी बाहेरून जिना काढून द्यावा अशा मागणी मनसेचे राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने केल्या. तिथे महिला विक्रेत्यांसाठी बाजार भरवला जाणार आहे. त्यापूर्वी या जागेवर व्यवसाय होत नाही म्हणून दुसरीकडे गेलेल्या विक्रेत्यांसोबत बैठक घ्यावी. त्यात त्यांनी येथील जागा हवी का नको याचा सोक्षमोक्ष लावला जावा. ते येणार नसतील तर इतर विक्रेत्यांना जागा द्यावी असे सांगण्यात आले.
याबाबत प्रशासक डॉ. बलकवडे यांनी जिन्याबाबतचे काम गतीने सुरू करावे. तसेच येत्या काही दिवसात जुने विक्रेत्यांसोबत बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले.