रमेश देसाई मेमोरियल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा

रमेश देसाई मेमोरियल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा

लोगो-
रमेश देसाई स्मृती टेनिस स्पर्धा  

5237
कोल्हापूर ः लॉन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळताना साई जान्वी टी.
5238
दुसऱ्या छायाचित्रात मुलांच्या गटात चेंडू फटकाविताना समर्थ सहिता.

पापरकर- सहिता यांच्यात विजेतेपदाची लढत
---
दुहेरीत महाराष्ट्राची आकृती सोनकुसरे- ऐश्वर्या जाधव जोडी अंतिम फेरीत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ : राज्य लॉन टेनिस संघटना व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटनेतर्फे आयोजित १८ व्या रमेश देसाई स्मृती १६ वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या समर्थ सहिता व अर्णव पापरकर यांच्यात विजेतेपदाची लढत रंगणार आहे. मुलींच्या गटात कर्नाटकच्या साई जान्वी टी. व तेलंगणाच्या ऋषिता बसिरेड्डी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
टेनिस कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दबदबा कायम राखला. पात्रता फेरीतून आलेल्या महाराष्ट्राच्या बिगर मानांकित अर्णव पापरकरने सातत्य राखत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत कर्नाटकच्या दुसऱ्या मानांकित आराध्य क्षितिजचा सरळ सेटमध्ये पराभव करीत खळबळजनक निकालाची नोंद केली. महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित समर्थ सहिताने दिल्लीच्या प्रणील शर्मा याचा एकतर्फी लढतीत पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. मुलींच्या एकेरी गटात कर्नाटकच्या बिगर मानांकित साई जान्वी टी.ने महाराष्ट्राच्या तेराव्या मानांकित नैनिका रेड्डी बेंद्रमनेचा, तर तेलंगणाच्या नवव्या मानांकित ऋषिता बसिरेड्डीने महाराष्ट्राच्या प्रिशा शिंदेचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरे व ऐश्वर्या जाधव या अव्वल मानांकित जोडीने ओडिशाच्या सोहिनी मोहंती व कर्नाटकच्या हरिशिनी एन. यांचा, तर महाराष्ट्राच्या नैनिका बेंद्रमणे व सेजल भुतडा या दुसऱ्या मानांकित जोडीने कर्नाटकच्या अरझान खोराकीवाला व दिल्लीच्या यशिका शोकीन या तिसऱ्या मानांकित जोडीचा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली.
मुलांच्या गटात आराध्या क्षितिज व श्रीनिकेत कन्नन या कर्नाटकच्या बिगर मानांकित जोडीने गुजरातच्या कबीर चोठानी व महाराष्ट्राच्या समर्थ सहिता या अव्वल मानांकित जोडीला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीच्या प्रणील शर्मा व हरियानाच्या आदित्य मोर यांनी तेलंगणाच्या धीरज रेड्डी व्ही. व राहुल लोकेश यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
निकाल : मुले- समर्थ सहिता (महाराष्ट्र) वि. वि. प्रणील शर्मा (दिल्ली) अर्णव पापरकर (महाराष्ट्र) वि. वि. आराध्य क्षितिज (कर्नाटक).
मुली- साई जान्वी टी. (कर्नाटक) वि. वि. नैनिका रेड्डी बेंद्रम (महाराष्ट्र), ऋषिता बसिरेड्डी (तेलंगणा) वि. वि. प्रिशा शिंदे (महाराष्ट्र).
दुहेरी गट- मुले- आराध्य क्षितिज (कर्नाटक) / श्रीनिकेत कन्नन (कर्नाटक) वि. वि. कबीर चोठानी (गुजरात)/ समर्थ सहित (महाराष्ट्र), प्रणील शर्मा (दिल्ली)/आदित्य मोर (हरियाना) वि. वि. धीरज रेड्डी व्ही. (तेलंगणा)/ राहुल लोकेश(तेलंगणा). मुली- आकृती सोनकुसरे (महाराष्ट्र)/ ऐश्वर्या जाधव (महाराष्ट्र) वि. वि. सोहिनी मोहंती (ओडिशा)/ हरिशिनी एन.(कर्नाटक), नानिका बेंद्रम (महाराष्ट्र)/ सेजल भुतडा (महाराष्ट्र) वि. वि. अरझान खोराकीवाला (कर्नाटक)/ यशिका शोकीन (दिल्ली).
--------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com