महाराष्ट्र राज्य १६ वर्षाखालील निमंत्रीत क्रिकेट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र राज्य १६ वर्षाखालील निमंत्रीत क्रिकेट स्पर्धा
महाराष्ट्र राज्य १६ वर्षाखालील निमंत्रीत क्रिकेट स्पर्धा

महाराष्ट्र राज्य १६ वर्षाखालील निमंत्रीत क्रिकेट स्पर्धा

sakal_logo
By

लोगो ः राज्य १६ वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धा 

कोल्हापूर जिल्हा एक डाव व १३८ धावांनी विजयी
वेंदात पाटीलच्या नाबाद १०० धावा व ४ बळी, राजदीप मंडलीकचे ७ बळी
 
कोल्हापूर, ता. २६: महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रित १६ वर्षाखालील (दोन दिवसीय) क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघ विरूद्ध धुळे जिल्हा संघ यांच्यामध्ये झाला.  सामन्यात कोल्हापूर जिल्हा संघाने एक डाव व १३८ धावांनी विजय मिळविला.
कोल्हापूर जिल्हा संघाने पहिला डाव ७८ षटकांत ९ बाद ३३२ धावांवर घोषित केला. यामध्ये वेंदात पाटील नाबाद १००, पॄथ्वेश जाधव ७५, प्रतिक होडगे ६७, धावा केल्या. धुळे जिल्हा संघाकडून पहिल्या डावात दिपक पवारने ४, सुदेश बाबरने २, देवेश त्रिमळे, अक्षय बावसकर व पियुष पाटील यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. धुळे जिल्हा संघाने पहिल्या डावात ४८.२ षटकांत सर्वबाद १३१ धावा केल्या. यामध्ये रोहीत सोनवणे ४६, सुदेश बाबर २३ व वरून पाटील १७ याने धावा केल्या. कोल्हापूर जिल्हा संघाकडून पहिल्या डावात वेंदात पाटीलने ३, राजदीप, मंडलीक, सौरभ सैनी व प्रथमेश हेंगाणा यांनी प्रत्येकी २, रूद्र लोंढेने १ बळी घेतला.कोल्हापूर जिल्हा संघाने पहिल्या डावात २०१ धावांची आघाडी घेत धुळे जिल्हा संघाला फॉलोऑन दिला. धुळे जिल्हा संघाने दुसऱ्या डावात २४ षटकांत सर्वबाद फक्त ६३ धावा केल्या. यामध्ये हेमंत पवार १८ व रोहीत सोनवणे १६ धावा केल्या. कोल्हापूर जिल्हा संघाकडून दुसऱ्या डावात राजदीप मंडलीकने ५, रुद्र लोंढेने ३ व वेंदात पाटीलने १ बळी घेतला.