इचल : अग्नि सुरक्षा भाग -दाेन

इचल : अग्नि सुरक्षा भाग -दाेन

मालिका लोगो आजच्या टुडे १ वरून घेणे ः भाग २
----------------
ich269.jpg
05270
इचलकरंजी : शहरातील शासकीय कार्यालयामध्ये कालबाह्य झालेले फायर सिलेंडर आहे.
--------------
शासकीय कार्यालयात कालबाह्य फायर उपकरणे
दस्ताऐवज, नागरिकांची सुरक्षा रामभरोसे; उपाययोजनांकडे दूर्लक्ष
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २९ : वाढत्या आगीच्या घटनांकडे शासकीय कार्यालयांनीही दूर्लक्ष केल्याचे दिसून येते. शहरात अनेक शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये कागदपत्रांचे गठ्ठे तसेच लाकडी ज्वलनशील साहित्य असते. मात्र आगीपासून बचावासाठी कार्यालयांमधून केवळ एक फायर सिलेंडर (fire extinguisher) बसवलेले दिसतात. मात्र ती ही फायर सिलेंडर कालबाह्य झाली आहेत. परिणामी शासकीय कार्यालयातील दस्ताऐवज व नागरिकांची सुरक्षा रामभरोसे आहे.
इचलकरंजीमध्ये प्रांताधिकारी कार्यालय, अप्पर तहसील कार्यालय, मंडल अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, नगर भुमापण, पुरवठा कार्यालय आदीसह अनेक शासकीय कार्यालये आहेत. यामध्ये शहर परिसरातील कोरोची, कबनूर, तारदाळ, चंदूर, खोतवाडी, रेंदाळ, हुपरी, साजणी आदी ठिकाणचे नागरिक कामानिमित्त कार्यालयांना भेट देत असतात. त्यामुळे बहुतांश वेळ कार्यालयामध्ये वर्दळीचे प्रमाण अधिक असते. मात्र या कार्यालयांचे अग्निप्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील अधिकतर कार्यालयामधील फायर सिलेंडर कालबाह्य झाली आहेत. त्यामुळे आगीचा प्रसंग उद्‍भवल्यास आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
शहरात छोटी आग विझवण्यासाठी अग्निशामक यंत्र (fire extinguisher) सिलेंडरचा वापर कार्यालयामधून होत असतो. अग्निशामक यंत्राच्या उपयोगाने आग रौद्र रूप धारण करण्यापूर्वी आटोक्यात आणण्यात मदत मिळते. त्यामुळे जीवित हानी तसेच आर्थिक नुकसानाचे प्रमाण कमी होते. मात्र शहरातील शासकीय कार्यालयातील ही यंत्राणाच कोलमडल्याचे दिसत आहे. अनेक कार्यालयांमध्ये अग्निशामक यंत्राची (fire extinguisher) नूतनीकरण मुदत संपली आहे. मात्र यंत्रणेकडे कार्यालयाचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील निबंधक कार्यालयामधील अग्निशामक यंत्रे २०१४ रोजी मुदत समाप्त झाली आहे. अशाच स्थितीत ती टांगल्याचे दिसतात. महत्वाची दस्ताऐवज असलेल्या या कार्यालयाची सुरक्षा राम भरोसे असल्याचे दिसत आहे. शहरातील शासकीय कार्यालयातील वर्दळ पाहता सक्षम अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे बनले आहे.
------------
अग्नीशमन दलाकडे अपुरे कर्मचारी
वस्त्रनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजी शहरात वाढते उद्योगधंदे व शहराचा विस्तार झाल्याने वारंवार आगीच्या दुर्घटना घडत असतात. यामध्ये जीवित हानी होवू नये तसेच आर्थिक नुकसानाचे प्रमाण कमी होण्यासाठी इचलकरंजी महानगर पालिकेचे अग्निशमन दल महत्वाची भूमिका निभवित आहे. मात्र हे दलही अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्येने ग्रासलेले आहे. शहरात एकाच वेळी दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्यास परिसरातील अन्य अग्निशामक दलाची मदत घ्यावी लागते.
---
शासकीय कार्यालयात फायर यंत्रणेविषयी प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. ज्या कार्यालयामधील फायर सिलेंडर मुदत कालबाह्य झाली आहे. अशा कार्यालयामधील अधिकाऱ्यांना फायर सिलेंडर अद्ययावत करून घेण्याच्या सूचना करण्यात येणार आहे.
-संजय कांबळे, विभागप्रमुख, महापालिका, अग्निशामक दल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com