
यिन समर युथ मुलाखती
फोटो
05240- प्राचार्य अभयकुमार साळुंखे
05242 ः चंद्रहार पाटील
05241 - राजकुमार पाटील
०००००००००
5253
माधुरी पवार यांच्या नृत्याविष्काराला साथ देणारे ‘यिन’ सदस्य.
5239
डॉ. बिंदू राव व त्यांच्या सहकारी कलाकारांनी सादर केलेले कथक नृत्य.
05243
शिबिरात सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनी.
०००००
‘यिन समर यूथ’ मुलाखती
...................
5244
पुणे येथील पीसीयू युनिव्हर्सिटीतील सहयोगी प्रा. डॉ. योगेंद्रकुमार देवकर.
चाकोरीबाहेर पडून
काम करायला शिका
---
प्रा. डॉ. योगेंद्रकुमार देवकर
विद्यार्थ्यांनी योग्य वयात योग्य मार्गदर्शन घेतले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे येथील पीसीयू युनिव्हर्सिटीतील सहयोगी प्रा. डॉ. योगेंद्रकुमार देवकर यांनी केले. ते म्हणाले, ‘‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स/डेटा सायन्सचा हा काळ आहे. फक्त एमपीएससी/यूपीएससी म्हणजे स्पर्धा परीक्षा नव्हेत. अन्य परीक्षांसाठी जसे, की सीईटी आदी परीक्षांची तयारीसाठी आतापासूनस प्रयत्न करा. एक-एक क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. वेळ वाया घालवू नका. ॲडव्हान्स कोर्सेस, व्होकेशनल कोर्सेसही करावे लागतील. अगदी इंजिनिअरिंगमधील ॲडव्हान्स कोर्सेसमध्ये खूप संधी आहेत.’’ ते म्हणाले, ‘‘ज्यांच्याकडे कौशल्ये आहेत, अपडेटेड कोर्सेस आहेत, त्यांना चांगले पॅकेज, चांगला पगार, पैसे नक्की मिळतील. याशिवाय, सॉफ्ट स्किल्स शिकणेही महत्त्वाचे आहे. कारण, कंपनीत तुम्ही मुलाखतीला जाता, तेव्हा सॉफ्ट स्किल्स आहेत का, हे विचारले जाते. प्लॅन ए, बी, सी तुमच्यासाठी तयार असायला पाहिजे.’’ प्रोफेशनल कोर्सेसला अधिक महत्त्व असून, कोणत्याही क्षेत्रातील ज्ञानाचे अपडेट्स तुमच्याकडे असली पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, ‘‘येणारा काळही ॲटोनॉमस युनिव्हर्सिटीचा आहे. पुण्यात तर अनेक ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी निर्माण झाल्या आहेत. तुम्ही डिग्री करीत असतानाच करिअरचा निर्णय घेणे महत्त्वाचे असते. जे चकाकते, ते सोने नसते, हे लक्षात असू द्या. चुकीची गोष्ट करू नका. तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्या. तरुणांचा देश म्हणून भारताकडे जगभरात पाहिले जाते. हे पॉप्युलेशन बर्डन नाही, तर ते समृद्ध ह्युमन रिसोर्सेस आहेत. यात तुम्ही असले पाहिजे. चाकोरीबाहेर पडून काम करायला शिका. नक्की संधी मिळतील. आमच्या पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटीत अनेक ॲडव्हान्स कोर्सेस आहेत. हे कोर्सेस केलेले खूप विद्यार्थी आज यशस्वीपणे कार्यरत आहेत. जे काही नवीन आहे, ते आम्ही स्वीकारले आहे.’’
...
5245
सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर (५२४५)
स्वत:च्या क्षमतेची जाणीव
महत्त्वाची ः गीता हसूरकर
स्वत:च्या क्षमतेची जाणीव महत्त्वाची आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘‘कोणतेही सामाजिक काम कसे करायचे, हे समजून घ्यायचे असेल तर पहिल्यांदा अभ्यास करायला शिका. ज्ञान, कौशल्ये, तत्त्वज्ञान, कायद्याच्या अभ्यासाची चौकट तुमच्याकडे असावी. स्वत:मध्ये पहिल्यांदा बदल करायला शिका. दुसरा जे काही सांगतो आहे, ते ऐकून घेण्याची क्षमता स्वीकारा. सामाजिक काम करताना सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, तरच सामाजिक काम घडू शकेल.’’ त्या म्हणाल्या, ‘‘कोणतीही अंधश्रद्धा पाळू नका. ताणतणावाला सामोरे जाऊ नका. घरातील अन्य ज्येष्ठांचा, आई-वडिलांशी संवाद साधा. त्यांचा प्रथम आदर करा. आपल्याकडे घराकडे, स्वत:कडे लक्ष द्या; मगच सामाजिक कामाला झोकून द्या.’’ सामान्य ज्ञानाचा अभ्यास करा, स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करा, असा सल्ला देत त्यांनी सांगितले, की ज्या गोष्टी मुळातच पटत नाहीत, त्या नाही म्हणायला शिका. जे क्षेत्र तुम्हाला निवडायचे आहे, त्यासाठी स्वत:च्या क्षमतेची जाणीव असणे गरजेचे आहे. खरेतर, कोणतेही सामाजिक प्रश्न हे आपणच निर्माण करीत असतो. कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका. दिवसातून काही वेळासाठीच सोशल मीडियाचा वापर करा; मात्र सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका. मानवी मूल्ये जपा. संविधानाचा, देशाचा आदरा करायला शिका. क्षमतांवर विश्वास ठेवा. तुमच्याकडे कोणती बलस्थाने आहेत, ती जाणून घ्या. स्वत:साठी, स्वत:च्या शरिराकडे जरा पाहा. जेणेकरून तुमच्यात ज्या काही त्रुटी आहेत, त्या समजतील. त्यावर मात करता येतील. समाजातील प्रश्नांवर अभ्यास करा; मगच सामाजिक कार्याला हातभार लावा.’’
...
5246 - स्वामी दत्तराज आनंद सरस्वती (५२४६)
मोठी स्वप्ने पाहा!
स्वामी दत्तराज आनंद सरस्वती यांचा सल्ला
प्रत्येक जण या जीवनात काही स्वप्ने साकारण्यासाठी आलेले आहेत; पण स्वप्ने मोठी पाहा, असे आवाहन चिन्मय मिशन कोल्हापूरचे स्वामी दत्तराज आनंद सरस्वती यांनी केले. ते म्हणाले, ‘‘आपण जे कर्म करतो, त्यातून देशाची, समाजाची सेवा होते. यासाठी मोठे कार्य करायला हवे. नक्की यश मिळेल. ध्येयाप्रत जाण्याकरिता वेळेचा सदुपयोग करा. प्रत्यक्ष चांगली कृती करा. निश्चित ध्येयाप्रत जाता येते, हा विश्वास मनी बाळगा. जीवनात जे यशस्वी झाले आहेत, त्यांनी अफाट प्रयत्न केले आहेत, हे जाणा.’’ ते म्हणाले, ‘‘आपल्या भारताला मोठी आध्यात्मिक परंपरा आहे. आपण पराभूत नाही आहोत. तसा गैरसमज अन्य देशांनी करून दिला आहे. बाहेरचे देश प्रगती करीत आहेत, तशीच प्रगती स्वत:च्या देशासाठी करायची असेल तर झेप घ्या. आपल्याकडे निसर्गाने ती शक्ती प्रदान केली आहे. प्रयत्न केले तर पुढे जाता येईल. यातून आनंद मिळेल. ध्येयप्राप्तीसाठी सतत कार्यरत राहा. नुसते ज्ञान असणे उपयोगी नाही, तर लढण्याचीही वृत्ती स्वत:कडे असली पाहिजे. यासाठी बुद्धीबरोबर ताकदही हवी. ही बुद्धी, ताकद स्वत:साठी, देशासाठी, समाजासाठी वापरली पाहिजे. कोणतेही मोठे कार्य असू दे. सर्वांनी एकत्र यावे. हे कार्य होते, यावर विश्वास ठेवा. मनाची एकाग्रता झाली, की अभ्यास होतो. अभ्यास झाला, की कार्य घडते. मग यशस्वी होता येते. परमेश्वराची भक्ती करा. शक्ती मिळेल. जीवनात तुम्हाला ज्यांचा आदर्श वाटतो, तो आदर्श समोर ठेवून कार्यरत राहा. ध्येयासाठी मन एकाग्र करा. यातून मोठी शक्ती कार्यरत होऊन यशस्वीतेकडे जाता येईल. प्रत्येक क्षणासाठी कार्यरत राहा. सुरुवात तर करा. पाहा, तुमचे जीवन उजळून निघेल.’’
...
५२४७
फोटो : शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. गुरव.
नवीन शैक्षणिक धोरणाकडे
डोळसपणे पाहा ः डॉ. गुरव
नवीन शैक्षणिक धोरणाकडे डोळसपणे पाहा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. गुरव यांनी केले.
ते म्हणाले, ‘‘भारत देशाला शिक्षणाची एक समृद्ध परंपरा आहे. पूर्वी तक्षशीला, नालंदा विद्यापीठातून ज्ञानाची अव्याहत गंगा सर्व जगात वाहत होती. काळ बदलत जातो, तसे शिक्षण व्यवस्थेतही बदल घडत असतात. गुरुकुल शिक्षण व्यवस्था पूर्वी होती. आज ही पद्धती नाही. आधुनिक कालखंड येत जातो, तसे नवी शिक्षण व्यवस्था निर्माण करावी लागते. इंग्रजांच्या काळात मॅकोले पद्धती आली. इंग्रज निघून गेले. आज भारत देश शिक्षणाच्या बाबतीत वेगाने प्रगती करीत आहे. अनेक बुद्धीमान लोक जगातील अनेक संस्था, विद्यापीठ, कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.’’ ते म्हणाले, ‘‘आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी देशात सुरू आहे. महाराष्ट्रात या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली. नवीन शिक्षण व्यवस्थेचा हा ढाचा महाराष्ट्र शासनाने दिला आहे. १ जुलैपासून महाराष्ट्रात याची अंमलबजावणी सुरू होईल. या नवीन धोरणाला काही जण विरोध करीत आहेत. आजच्या काळाची गरज वेगळी आहे. यासाठी नवीन शैक्षणिक धोरणात सर्व घटकांसाठी काळजी घेतली आहे. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हीटीज आहेत. जेणेकरून तुमच्या गुणांमध्ये गुणांची क्रेडिटस् मिळतील.’’ ते म्हणाले, ‘‘या धोरणात लवचिकता ठेवली आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे, ते काम तुम्ही करू शकता. ज्यांना जे आवडते, ते करण्याची मुभा दिलेली आहे. आधीची शिक्षण व्यवस्था ही चांगली होती; पण यशस्वी अंमलबजावणी झाली नाही. आता कौशल्यावर आधारित शिक्षण व्यवस्थेवर भर दिला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात विद्यार्थी कार्यरत असेल तर त्याला गुणांमध्ये क्रेडिट घेता येतील. याचा फायदा विद्यार्थ्याला होईल. जसे की, संशोधन प्रकल्प, फिल्ड प्रोजेक्ट, दुसऱ्या फॅकल्टीमधून जे काही उत्कृष्ट आहे, ते घेता येईल. आता तर शिक्षणाच्या संपत्तीबरोबर वनस्पतींची संपत्तीही प्रत्येकाने जपली पाहिजे. या नवीन शैक्षणिक धोरणाकडे डोळसपणे पाहा.’’
...
5250 : स्टार्टअप कोच सचिन कुंभोजे.
क्रिएटिव्हीटी थिंकिंगलाच
खूप संधी ः सचिन कुंभोजे
नोकऱ्या कमी झाल्या आहेत; पण तितक्याच क्रिएटिव्हीटी थिंकिंगने काम करणाऱ्या व्यक्तींना मात्र खूप संधी आहेत, असे मत स्टार्टअप कोच सचिन कुंभोजे यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘‘जगभरातील असो, की देशातील उद्योग क्षेत्रात कौशल्य असलेल्या व्यक्तीला अधिक महत्त्व आले आहे. जसे स्टार्टअप उद्योग, अन्य क्षेत्रातील उद्योग. तुमच्याकडे क्रिएटिव्हीटी थिंकिंग असेल तरच तुम्ही यशस्वी व्हाल. नुसते ज्ञान असून उपयोग नाही. तुम्हाला कोणतेही उत्पादन विकता आले पाहिजे. आता तर रोबोटिक, डेटा सायन्स, चॅटजीपीटीसारखी तंत्रज्ञानांनी जग बदलून टाकले आहे. परिणामी, नोकऱ्या कमी झाल्या आहेत; पण तितक्याच क्रिएटिव्हीटी थिंकिंगने काम करणाऱ्या व्यक्तींना मात्र खूप संधी आहेत. जेणेकरून तुम्हाला रिप्लेस होता येणार नाही.’’ ते म्हणाले, ‘‘आताच्या युगातील उद्योगांमध्ये क्रिएटिव्हीटी कँडीडेटस् लागतात; मात्र तुमच्याकडे मार्केटिंग कौशल्य हवे. तुम्हाला ते यशस्वीपणे विकता आले पाहिजे. यासाठी नवीन जाहिरातींचे युग सुरू झाले आहे. पूर्वीच्या जाहिरातींसारख्या या जाहिराती नाहीत. त्यात क्रिएटिव्ह मेसेज दिलेला असतो. पटकन या जाहिरातींकडे लक्ष जाते. पारंपरिक जाहिरातींचा काळ मागे पडला आहे. तुमच्याकडे वेगळे काय आहे, हे तुम्हाला संबंधित कंपनीला सांगावे लागेल, तरच तुमचा विचार होईल. आताच्या नवीन मुला-मुलींमध्ये निश्चित क्रिएटिव्हीटी थिंकिंग आहे. तुम्हाला संबंधित कंपनीत या अशा थिंकिंगने डायमंड म्हणून स्वीकारले जाईल. याबरोबर मेसेज टेक्स्ट, व्हिडिओद्वारे तुम्ही क्रिएटिव्ह मेसेज पाठवू शकता. हा क्रिएटिव्ह मेसेज आगळावेगळा असेल. कुणाचेही लक्ष वेधून घेईल. कोणताही जॉब ॲप्लाय पाहा. तिथे तुम्हाला क्रिएटिव्ह कंटेटर पाहिजे, असे दिसेल. तुमच्याकडे क्रिएटिव्हीटी थिंकिंगची क्षमता जरूर आहे, त्याचा वापर करा. आता चौथी औद्योगिक क्रांती सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ७५ दशलक्ष नोकऱ्या गायब होणार आहेत. याबरोबर १३३ दशलक्ष नोकऱ्याही वेगवेगळ्या क्षेत्रांत निर्माण होणार आहेत. डेटा ॲनालिस्ट, न्यूज टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट अशा मागण्या असतील. विद्यार्थ्यांनो, तुमच्याकडे प्रत्येकाकडे हे कौशल्य, एक्स फॅक्टर आहे.
...
05251, किंवा ५२५२ अभिनेत्री माधुरी पवार
नृत्य हे माझे
जगणे ः माधुरी पवार
दिवसभरात तुम्ही किती वेळा श्वास घेता, तितक्या वेळा मी नृत्याचा सराव, अभ्यास केला. नृत्य हे माझे जगणे आहे. बालवाडीपासून मी नृत्य करायला शिकले, असे अभिनेत्री माधुरी पवार यांनी येथे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘अलीकडे नवीन ट्रेंड पाहिजे, असा अट्टाहास असतो, मग नवीन ट्रेंडनुसार गाण्यावर प्रेझेंट व्हावे लागते. ‘सकाळ’शी माझं जुनं नातं आहे, हे मी आवर्जून तुम्हाला सांगते. कलेसाठी आपण काहीतरी करीत असतो, मग प्रेक्षकही सुखावतो. तुम्ही कला सादर करीत असला तरी प्रेक्षकांनाही ती कला आवडली पाहिजे. शेवटी प्रेक्षक हाच आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.’’ तुम्ही विचारता, की तुम्हाला कोणते गाणे आवडते? कोणत्या गाण्यावर तुम्हाला डान्स करता येतो? तुम्हाला सांगते, मला सर्व गाणी प्रिय आहेत. सर्व गाण्यांवर मला थिरकता येते. लीला गांधी, श्रीदेवी या माझ्या आयडॉल्स आहेत. लावणीसाठी कोल्हापूरकरांनी माझ्यावर अधिक प्रेम केले. दाद मिळत गेली. आज दाद मिळवून देणारा प्रेक्षकवर्ग समोर असतो. त्या म्हणाल्या, ‘‘कोणताही कलाकार हा कलेकलेने आकार घेत असतो. काही काळ यासाठी जात असतो; मग तो पूर्णत्वाकडे जातो. कोणताही कलाकार कुठेही चमकू शकतो. एखादी अदाकारी त्याला टॉपला नेऊन ठेवते. काम करीत राहावे लागते. नवीन युगातील गाणी, ट्रेंडस्चा अभ्यास करावा लागतो. अभ्यास, रियाझ आवश्यक असतो. तुम्ही अपडेटस् असावे लागते.’’
...
05255
सलगर अमृततुल्य चहाचे संचालक दादू सलगर.
‘सलगर चहाचा प्रवास
नक्कीच सोपा नव्हता’
‘‘सलगर चहाचा हा १६ ते १७ वर्षांपर्यंतचा हा प्रवास साधा सोपा नक्कीच नव्हता, अशी भावना सलगर अमृततुल्य चहाचे संचालक दादू सलगर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडिलांची १५ एकर शेती होती. आमचा भाग असा आहे, की चार-चार वर्षे पाऊस पडत नाही. आई-वडील कामानिमित्त कणकवलीला गेले होते. कणकवलीतील चिरे खाणीसाठी वडिलांनी घेतलेला ट्रॅक्टर आम्ही वापरला. रात्री मी चिरे वाहतुकीचे काम करीत असे. या व्यवसायातून जे पैसे येतील, त्यातील निम्मे पैसे मी साठवून ठेवत असे. मग बाबांना सांगितले, की कोकण सोडून गावी जाऊ. मी दोन वर्षांत म्हणजे, १९९८-९९ मध्ये दीड लाख रुपये बचत केलेले आहेत, असे सांगितले. ती रक्कम मोठी होती. आम्ही कोकण सोडून गावाकडे आलो. ट्रॅक्टर, डोझरही घेतला. नंतर शेतीसाठी तो वापरला.’’ ते म्हणाले, ‘‘महाविद्यालयात असताना मी स्वप्न पाहिले होते, की आपण एक व्यवसाय करावा. त्यातून पैसे चांगले मिळवावेत. शिक्षण न घेता व्यवसायच करूया, असा निर्धार केला. कष्ट करावे लागले. द्राक्षे लावली. शेळीपालन केले. भेंडी लागवड केली, पण खूप तोटा झाला. नंतर पुणे गाठले. पुणे सोडून परत गावी जायचे नाही, असे ठरविले. काहीतरी शिकायचे. मी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविले. दहा-बारा वर्षे स्ट्रगल करावे लागले. कोणत्याही व्यवसायाबद्दल माहिती घ्यावी. रसवंतिगृह काढली, ती वाढवत नेली. सात रसवंतिगृहे होती. मक्याची कणसे विकली. बारा महिने चालणारा व्यवसाय असावा, असे मनात आले. प्रत्येक वर्षी दहा लाख रुपयांची ‘एफडी’ करीत होतो. चहाच्या व्यवसायात आलो नसतो तर बॉयलर पोल्ट्री फार्म असती; पण नशिबाने चहाच्या क्षेत्रात आलो. लाकडी खेळणी विकली. २०१८ मध्ये चहामध्ये काम करायला निर्णय घेतला. चहाची वेगळी ट्रायल घेतली. चांगल्या टेस्टपर्यंत आलो. कोल्हापूरमध्ये जिथे रसवंतिगृहे आहेत, तिथे चहाचे स्टॉल टाकायचे. २०१८ मध्ये चहाच्या तीन शाखा सुरू केल्या. मग हळूहळू यश मिळत गेले.
...
5254
सौरभ शेट्टी व ऋतुराज क्षीरसागर यांच्याशी संवाद साधताना ताज मुल्लाणी.
प्रत्येक अडचणीत
नागरिकांबरोबर ः ऋतुराज क्षीरसागर
कोविडच्या काळात आम्ही प्रत्येक घरात भाजीपाला सुपूर्द केला. यानंतर युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचा ॲडमिशनचा प्रश्न हाती घेतला. युवा सेनेच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांत युवकांना प्रवेशासाठी प्रयत्न केले. दहा ते बारा वर्षांपासून हे काम सुरू आहे, असे मत युवा सेनेचे ऋतुराज क्षीरसागर यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडचणीत आम्ही काम करीत आलो आहोत. विवेकानंद महाविद्यालयात ‘नो मर्शी...’ संघटना कार्यरत होती. ‘नो’मधील ‘केएनओडब्ल्यू’ असा त्यातील शब्द होता. म्हणजे, सर्वांना दया दाखवा, असा त्याचा अर्थ होता. आम्ही अनेक विद्यार्थ्यांना दया दाखविण्याचेच काम केले आहे. विद्यार्थीही अनेक समस्या सोडविण्यासाठी येत होते.
शिक्षणात शिस्त महत्त्वाची ः सौरभ शेट्टी
अनेक विद्यार्थी महाविद्यालयात येतात, तासाला बसतात; पण प्रॅक्टिकला चुकवतात. प्रॅक्टिकलला बसतात; पण लेक्चरला बसत नाही, अशा तक्रारीही विद्यार्थ्यांच्या असतात. मात्र, दोन्हीची सांगड घातली गेली पाहिजे, असे मत स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सौरभ शेट्टी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘शिक्षण प्रणालीत जे शिकतो, ते केले तर विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. पळवाट काढण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे. नुसते पदवी असणे उपयोगाची नाही. शिक्षण प्रणालीसाठी शिस्त महत्त्वाची आहे. शिकून समाज घडविण्यासाठी उपयोग झाला पाहिजे. विविध कला, सांस्कृतिकता शिकवण्याची ही गरज आहे. खेड्यातील-शहरातील शिक्षण प्रणाली वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी ती पुस्तकांतून आली पाहिजे. तरुणांच्या समस्या सोडविण्यासाठी राजकारणात काम करता येते.